Download App

Nargis Fakhri: …म्हणून अभिनेत्री नरगिस फाखरी स्वतः ला वॉटर बेबी म्हणते

Nargis Fakhri On water Baby: नरगिस फाखरी (Nargis Fakhri) ही बॉलिवूडच्या (Bollywood) सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार’ (Rockstar Movie) सिनेमातून हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील नर्गिसच्या अभिनयाची खूप प्रशंसा मिळाली होती. त्यानंतर ती अनेक सिनेमामध्ये दिसली. मात्र गेल्या 2 वर्षांपासून ती रुपेरी पडद्यावरुन गायब आहे.

दरम्यान, आता अभिनेत्री ही नवीन अडवेंचर करताना दिसते आणि यातून तिच्या याबद्दलच प्रेम दिसून येत आहे. नर्गिस जिने’ रॉकस्टार’ मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केलं आणि तिने स्वतः ह वॉटर-बेबी असल्याचे कबूल केले आहे. ती म्हणाली की, तिला सेलिंग, पॅडल बोर्डिंग, कयाकिंग आणि जेट स्कीइंग यांसारख्या जल-आधारित स्पोर्ट्समध्ये सहभागी व्हायल आवडत.

अभिनेत्रीने याबद्दल बोलताना हे देखील उघड केले की तिला स्नॉर्कलिंग आवडत परंतु स्कूबा डायव्हिंगच्या पहिल्या प्रयत्नात ती अयशस्वी झाली आणि तिला याचा पुन्हा अनुभव घ्यायचा आहे. तिला वेकबोर्डिंग, क्लॅमिंग आणि फिशिंग देखील आवडते.

World Book Day निमित्त शिवानी बनली लेखिका! कॉफी, रेन्स अँड टुमारो पुस्तक लॉंच

नर्गिस आता इंडस्ट्रीत कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. नर्गिसला दुबईतील आयफा अवॉर्ड्स 2022 मध्ये अखेरचं पाहायला मिळाली होती. यादरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ती म्हणाली की, ‘सध्या त्यांच्या हातात चार स्क्रिप्ट आहेत, ज्यावर चर्चा सुरू आहे. कदाचित पुढच्या वर्षी तुम्ही मला पुन्हा पडद्यावर पाहू शकणार आहात. मी पुन्हा एकदा पडद्यावर येण्याची वाट पाहत आहे. नर्गिस शेवटची 2020मध्ये ‘तोरबाज’ सिनेमात दिसली होती. तिचे काही मोठे प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. ज्यांची घोषणा ती या वर्षाच्या अखेर करणार आहे.

follow us

वेब स्टोरीज