Download App

Navra Majha Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा 2’ ची ट्रेन सुसाट, विकेंडला कमावले ‘इतके’ कोटी

Navra Majha Navsacha 2: सध्या सगळीकडे 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळते. या चित्रपटाने विकेंडला किती कमाई केली.

Navra Majha Navsacha 2 Box Office : दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ (Navra Majha Navsacha 2) या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. (Box Office) “नवरा माझा नवसाचा 2” (Marathi Movie) चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला (Navra Majha Navsacha 2 Box Office) प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे.

1 हजारपेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६००पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. वीकेंडला 7.84 कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवादलेखन संतोष पवार यांचं आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे. नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.

सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहु ण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडले आहे. बऱ्याच दिवसांपासून रसिक प्रेक्षकांमध्ये “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट चर्चेत राहिला आणि त्याचंच प्रतिबिंब बॉक्स ऑफिसवरही उमटत आहे. चित्रपटावरचं प्रेम प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिसादातून दाखवून दिलं आहे. आता येत्या काही दिवसांत हा प्रतिसाद आणखी वाढेल यात शंका नाही.

नवरा माझा नवसाचा 2′ झळकतोय पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर, २० सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित

सिनेमाच्या कथे विषयी

‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटात एक वेगळी कथा पाहायला मिळाली. एसटी बसने सुरु झालेला प्रवास आता ट्रेनवर येऊन पोहोचला आहे. सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी हे नवस फोडण्यासाठी यावेळी ट्रेनने जात असतात. त्यांच्या ट्रेनच्या प्रवास येणारे अडथळे आणि धमाल पाहायला प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. शिवाय “नवरा माझा नवसाचा चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता “नवरा माझा नवसाचा 2″मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसी झाले आहेत. येत्या काळात या सिनेमाच्या कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us