Download App

Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च

Navra Maza Navsacha 2: 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा सिक्वल येणार हे जाहीर झाल्यापासूनच रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली

Navra Maza Navsacha 2 Poster Launched: 2 तब्बल 19 वर्षापूर्वी अल्पावधीतच हिट झालेल्या “नवरा माझा नवसाचा” (Marathi Movie) ह्या एव्हरग्रीन सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर आता “नवरा माझा नवसाचा 2” (Navra Maza Navsacha 2) ह्या चित्रपटाचा सिक्वल येणार हे जाहीर झाल्यापासूनच रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. (Social Media) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आलेल्या रिलीज डेटच्या टीजर व्हिडिओला तर अल्पावधीतच कमालीचा प्रतिसाद मिळाला.


नुकतचं ह्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च (Navra Maza Navsacha Poster Launched) करण्यात आले असून येत्या 20 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत.

दमदार स्टारकास्ट

या सिनेमात अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या पोस्टरवर बघायला मिळत आहे, त्यामुळे प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन होणार यात काही शंका नाही. चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक टीजर देखील सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

त्याशिवाय “नवरा माझा नवसाचा चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता “नवरा माझा नवसाचा 2″मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसी झाले आहेत.

Navra Mazha Navsacha 2: सचिन पिळगावकरच्या ‘या’ सिनेमाचा दुसरा भाग लवकरच येणार

“नवरा माझा नवसाचा” हा चित्रपट अल्पावधीतच कमालीचा हिट झाला होता. पहिल्या भागातला चमत्कारिक नवस फेडताना उडालेली तारांबळ अतिशय मनोरंजक ठरली होती. त्यामुळे आता “नवरा माझा नवसाचा 2” मध्ये नक्की काय घडते ज्यामुळे रेल्वे प्रवास करावा लागतो यासाठी अजुन रसिक प्रेक्षकांना थोडी वाट पहायला लागणार आहे.

follow us