Navra Mazha Navsacha 2: सचिन पिळगावकरच्या ‘या’ सिनेमाचा दुसरा भाग लवकरच येणार

Navra Mazha Navsacha 2: सचिन पिळगावकरच्या ‘या’ सिनेमाचा दुसरा भाग लवकरच येणार

Navra Mazha Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Mazha Navsacha) या बहुचर्चित सुपरहिट सिनेमाचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie) सचिन पिळगावकरच्या ( Sachin Pilgaonkar) चाहत्यांसासाठी ही गोड बातमी असणार आहे. 20 वर्षांअगोदर गाजलेल्या सिनेमाचा अखेर मुहूर्त ठरला आहे.

सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात: ‘नवरा माझा नवसाचा 2’ या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांनी या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची हिंट दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “नवरा माझा नवसाचा 2′ शूटिंगला लवकरच सुरुवात.. तुमचे आशीर्वाद असेच सोबत राहुद्या”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jaywant Pandurang Wadkar (@jaywantwadkar)


जयवंत वाडकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या सिनेमाच्या पोस्टवर सगळी तगडी स्टारकास्ट हवी, प्रदीप वटवर्धन यांची आठवण येणार आहे, अशोक मामा असतील तर सिनेमा सुपरहिट होणार आहे, आजही त्या पहिल्या भागाची चर्चा होत असताना बघायला मिळत असते, खूप खूप शुभेच्छा, आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा, अशा कमेंट्स चाहत्यांची होत असताना दिसत आहेत.

‘नवरा माझा नवसाचा’ हा सिनेमा 2004 मध्ये चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या विनोदी सिनेमाची निर्मिती किट्टू फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या सिनेमात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक मामा, सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आणि विजय पाटकर हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत.

Sai Tamhankar: ‘भक्षक’ सिनेमातील पोलीस अधिकारी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘नवरा माझा नवसाचा 2’ या आगामी मराठी सिनेमाची घोषणा झाल्यामुळे आता हा सिनेमा कधी रिलीज होणार? या सिनेमात नेमके कोण कलाकार मनोरंजन करणार आहात? या सिनेमाचं कथानक नेमकं काय असणार आहे? याची चाहत्यांना देखील मोठी उत्सुकता लागली आहे. सचिन पिळगावकर या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’ या सिनेमातील गाण्यांना चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज