Download App

Dharmaveer 2 : नवरात्र उत्सवानिमित्त खास भेट; ‘धर्मवीर 2’ चित्रपट फक्त 99 रुपयांत…

नवरात्र उत्सवानिमित्त प्रेक्षकांना येत्या 4 ऑक्टोबरला धर्मवीर 2 चित्रपट फक्त 99 रुपयांत चित्रपटगृहात अनुभवता येणार आहे.

Dharmaveer 2 Movie : नवरात्र उत्सवानिमित्त धर्मवीर (Dharmaveer) चित्रपटाच्या टीमकडून प्रेक्षकांना भेट देण्यात आलीयं. प्रेक्षकांना येत्या 4 ऑक्टोबरला धर्मवीर 2 चित्रपट फक्त 99 रुपयांत चित्रपटगृहात अनुभवता येणार आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. त्याच धर्तीवर आता धर्मवीर 2 हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झालायं. नवरात्र उत्सवानिमित्त हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांना फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. धर्मवीर2 चित्रपटाच्या टीमकडून ही घोषणा करण्यात आलीयं.

आरोपीला स्थानिक नेत्यांनीच पळवून लावलं; पोलिस तपासात उघड, फडणवीसांनी सांगितलं

हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर 2 चित्रपट 27 सप्टेंबरला जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झालायं. धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर धर्मवीर 2 मध्ये काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. अखेर या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली असून आत्तापर्यंत चित्रपटाने तब्बल 12.28 कोटी रुपयांची कमाई केलीयं.

आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत होती, आता धर्मवीरच्या दुसऱ्या भागामध्ये या प्रश्नांची उत्तरे समोर आली आहेत. या चित्रपटाची सुरुवात 1500 पेक्षा अधिक शोजने करण्यात आली असून ‘नाथा घरच्या आनंदाची गोष्ट’, व्ह्यू इज एकनाथ शिंदे सांगणारी दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट’, चरित्रपटातून प्रखर हिंदुत्वाचा जागर या शब्दांत समीक्षकांनी या चित्रपटाचा गौरव केला आहे.

दिघेंचा जीवनपट पाहण्यासाठी भरभरुन प्रतिसाद…
मुंबई, ठाणे,पालघर एवढंच नाही तर पुणे, कोल्हापुर, इचलकरंजी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा  अशा संपूर्ण महाराष्ट्रात धर्मवीर 2 चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुढील काही दिवसांत कलेक्शनमध्ये आणखी वाढ होणार हे नक्की.

पूजा खेडकर पुन्हा चर्चेत, आता ‘त्या’ प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली तक्रार

धर्मवीर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केल्याचं पाहायला मिळालं आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी राज्यभरातून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहात दाखल होत आहे. एवढंच नाही तर संपूर्ण कुटुंबदेखील चित्रपट पाहण्यासाठी रांग लावत असल्याचं दिसून आलं आहे.

follow us