… तर भुजबळ तेव्हाच वर गेले असते; खैरे यांनी सांगितला थरार
Chandrakant Khaire on Bhujbal; चंद्रकांत खैरेंनी छगन भुजबळांच्या शिवसेना फुटीचा थरारक किस्सा सांगितला; आनंद दिघेंसोबत त्यांना शोधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा केला खुलासा.
Chandrakant Khaire on Bhujbal split from Shiv Sena : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवसेना (Shiv Sena) सोडली होती, तेव्हाचा एक थरारक किस्सा लेट्सअप मराठीशी संवाद साधताना सांगितला.
Tukaram Mundhe : महाप्रसादासाठी अधिकृत नोंदणी अनिवार्य; तुकाराम मुंढेंचा मोठा आदेश
ते म्हणाले की, जेव्हा छगन भुजबळ 16 ते 17 आमदारांना घेऊन शिवसेनेतून फुटले होते, तेव्हा आनंद दिघे साहेब (Aanand Dighe) आणि मी त्यांना शोधण्यासाठी खुप फिरलो. साहेबांकडे त्यावेळी सर्व काही होतं. पण छगन भुजबळ काही सापडले नाहीत, जर ते सापडले असते तर ते तेव्हाच वर गेले असते आणि आम्ही 302 कलामाअंतर्गत जेलमध्ये गेलो असतो. असा किस्सा चंद्राकांत खैरे यांनी सांगितला.
रोहित पवारांच्या पीएच्या 12 वर्षीय मुलीचा रहस्यमय मृत्यू; नेमकं काय घडलं?
छगन भुजबळांचा किस्सा सांगताना ते पुढे म्हणाले, मी आणि आनंद दिघे साहेब रिक्षामध्ये बसून त्यांना शोधत होतो. नंतर आम्हाला कळालं की ते नागपुरच्या एमएसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये आहेत. आम्ही तेथे गेलो, तेव्हा रिक्षातूनच पहिल्यांदा दिघे साहेबांची दाढी भुजबळांना दिसली आणि भुजबळ ‘दाढी आली…दाढी आली’ म्हणत गेस्ट हाऊसच्या मागे असलेल्या जंगलात पळाले. आम्ही दोघे भुजबळांना त्या जंगलात शोधत होतो पण ते काही सापडले नाहीत. तेव्हा दिघे साहेब म्हणाले, ‘आज माझी शिकार गेली’.
Japan Earthquakes : जपानमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप, 23 जण जखमी; टोकियोमध्ये अंधार
हा थरार रात्री 9 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशीच्या दुपारपर्यंत चालला होता. दुपारनंतर आम्ही तेथील सावजीच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो, तेथील वेटर आला अन् दिघे साहेबांना म्हणाला, तुम्ही आनंद दिघे का? दिघे साहेब म्हणाले, ‘नाही मी आनंद दिघे नाही’ मग त्या वेटरने त्याच्या ड्रॉवरमधून चक्क दिघे साहेबांचा फोटो आणून दाखवला. तेव्हा दिघे साहेब त्या वेटरला म्हणाले की, मी आनंद दिघे आहे हे इथे कुणाला सांगू नकोस. जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा भुजबळांना शोधायला निघालो आणि रात्री 2 वाजेपर्यंत शोधत होतो, तरी कोणीच सापडलं नाही. असा शोधमोहीमेचा थरारक किस्सा चंद्रकांत खैरेंनी सांगितला.
‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात पैसे वाटपाचा आरोप, चौकशी होणार; CM फडणवीसांच्या सूचना
पुढे ते म्हणाले, आता या शिवसेनेतून फुटलेल्या गद्दारांचा खोपकर केला पाहिजे. त्यावेळी त्या खोपकर केसमध्ये दिघे साहेबांना अटक झाली होती. तसेच एकनाथ शिंदेंनी जो दिघे साहेबांच्या आयुष्यावर ‘धर्मवीर’ नावाचा चित्रपट काढला होता, त्यात हा ‘खोपकर सीन’ आहे. तेव्हा सिनेमातही दाखवलं होतं की ‘गद्दारांना क्षमा नाही’ पण त्याच्या काही दिवसांनीच एकनाथ शिंदे स्वतः गद्दारी केली. मग आता या गद्दारांचं काय करायचं? असे खैरे यावेळी म्हणाले.