Sharad Pawar यांनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘महाराष्ट्र शाहीर’, अन् म्हणाले, ‘अंकुशच्या अभिनयाचे …’

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संपूर्ण कुटूंबाबरोबर रविवारी ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा चित्रपट सिनेमागृहांत जाऊन पाहिला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिल्यानवर शरद पवारांनी चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या टीमचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.   View this post on Instagram   A […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 01T111920.465

Sharad Pawar

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संपूर्ण कुटूंबाबरोबर रविवारी ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा चित्रपट सिनेमागृहांत जाऊन पाहिला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिल्यानवर शरद पवारांनी चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या टीमचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.


केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी (Ankush Choudhari) मुख्य भूमिकेत असून त्याने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा २८ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शाहीर साबळे यांच्यावर या बायोपिकमध्ये त्यांच्या जीवनाचे आणि व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू दाखविण्यात आले आहेत.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत चाहत्यांना दिसून आला आहे, त्याने शाहीर साबळे यांची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे साकारली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवारांनी अंकुश चौधरीचंही कौतुक केलं आहे. “शेवटचं गाणं सुरु झालं आणि मी अंकुशला पूर्णतः विसरून गेलो.

मला फक्त शाहीर साबळे दिसून आले असल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले आहे. केदार शिंदेंची लेक सना शिंदेने ‘महाराष्ट्र शाहीर’मधून मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण केले आहे. सनाने या सिनेमात शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका साकारली आहे. आणि यासोबतच अभिनेत्री अश्विनी महांगडे आणि निर्मिती सावंत यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारले आहेत.

Exit mobile version