Download App

‘नींद भी तेरी’: अमेझॉन MGM स्टुडिओ इंडिया अन् अनुराग कश्यप यांच्या ‘निशानची’ चित्रपटातील गाणं प्रदर्शित

Neend Bhi Teri : जार पिक्चर्स आणि फ्लिप फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘निशानची’ (Nishanchi) या चित्रपटाचे निर्माते अजय राय (Ajay Rai) आणि

  • Written By: Last Updated:

Neend Bhi Teri : जार पिक्चर्स आणि फ्लिप फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘निशानची’ (Nishanchi) या चित्रपटाचे निर्माते अजय राय (Ajay Rai) आणि रंजन सिंग (Ranjan Singh) आहेत, तर दिग्दर्शन सुप्रसिद्ध अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता ऐश्वर्य ठाकरे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करत आहेत, आणि ते एका दमदार डबल रोलमध्ये झळकणार आहेत. त्यांच्यासोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद झिशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. ‘निशानची’ चित्रपट 19 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अमेझॉन MGM स्टुडिओ इंडिया आणि झी म्युझिकने आज अनुराग कश्यप यांच्या आगामी चित्रपट ‘निशानची’ मधील एक रोमँटिक गाणं ‘नींद भी तेरी’ प्रदर्शित केलं आहे. हे गाणं मनन भारद्वाज यांनी संगीतबद्ध केलं आहे, त्यांनीच हे गाणं लिहिलं आणि गायलेलंही आहे. त्यांच्या खास शैलीमध्ये बनवलेलं हे गाणं अत्यंत सुकून देणारं आणि भावनिक आहे. प्रेमाच्या नाजूक भावना, मनातील अनकथ भावना आणि नात्यांमध्ये घडणाऱ्या सूक्ष्म बदलांना हे गाणं अतिशय सुरेखपणे उभं करतं.

चित्रपटातील भावनांना अधिक खोलवर पोहोचवण्यासाठी ‘नींद भी तेरी’ या गाण्याचं दुसरं व्हर्जन देखील चित्रपटात समाविष्ट करण्यात आलं आहे, जे मुख्य अभिनेता ऐश्वर्य ठाकरे यांनी स्वतः गायलेलं आहे. ते या चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहेत.

हे रोमँटिक गाणं एका लव्ह ट्रायंगलवर आधारित आहे आणि त्याचे सुंदर बोल व धून श्रोत्यांच्या मनात खोलवर घर करतात. मनन भारद्वाज यांनी बनवलेलं संगीत एक वेगळा अंदाज आणि देशी भावना यांचं सुरेख मिश्रण आहे, जे ऐकणाऱ्याला खऱ्या आणि खोल भावना अनुभवण्यास भाग पाडतं. हे गाणं इतकं सोपं आणि संस्मरणीय आहे की, जेव्हा केव्हाही तुम्हाला काही खरं, भावनिक ऐकायचं वाटेल, तेव्हा तुम्ही हे परत परत ऐकू इच्छाल.

आपल्या अनुभवाविषयी सांगताना संगीतकार मनन भारद्वाज म्हणाले, “नींद भी तेरी हे गाणं अशा भावना व्यक्त करतं जे शब्द नेहमी सांगू शकत नाहीत शांतता, तडफड, आणि संकोच. हाच निशानची चित्रपटाचा खरा आत्मा आहे. मी स्वतः हे गाणं गाऊन त्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्या आहेत, जेणेकरून प्रेक्षक फक्त गाणं न ऐकता, चित्रपटाच्या भावनिक प्रवासालाही अनुभवतील.”

अनुराग कश्यप यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला निशानची चित्रपट अजय राय आणि रंजन सिंग यांनी जार पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार केला आहे, ज्याला फ्लिप फिल्म्सचा सहभाग लाभलेला आहे. चित्रपटाची कथा प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी एकत्रितपणे लिहिलेली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना एक अफलातून सिनेमॅटिक अनुभव देण्याचं वचन देतो, ज्यामध्ये दोन भावांची गुंतागुंतीची कहाणी दाखवण्यात आली आहे. हे दोघं वेगवेगळ्या मार्गांनी चालत असून त्यांची निवड त्यांचं भविष्य ठरवते. निशानची चित्रपट संपूर्ण देशभरातील सिनेमागृहांमध्ये 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

follow us