‘निशानची’ च्या प्रमोशनसाठी अनुराग, ऐश्वर्य आणि वेदिकासह लखनऊमध्ये
Nishanchi Film च्या प्रमोशनमध्ये अनुराग कश्यप सक्रिय झाले आहेत. त्यांनी चित्रपटाचे स्टार्स – ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिकासह लखनऊला भेट दिली.

Nishanchi Film Team in Lucknow for promosion : प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि आपल्या धडाकेबाज, बोल्ड स्टोरीटेलिंगसाठी ओळखले जाणारे अनुराग कश्यप आता आपल्या बहुचर्चित आगामी चित्रपट ‘निशानची’ च्या प्रमोशनमध्ये सक्रिय झाले आहेत. चेन्नईनंतर आता त्यांनी चित्रपटाचे लीड स्टार्स – ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिका पिंटो यांच्यासह लखनऊला भेट दिली. लखनऊच्या प्रतिभा थिएटरमध्ये या तिघांनी चित्रपटाचा पोस्टर लॉन्च करत, ‘निशानची’चं जोरदार प्रमोशन केलं. या प्रमोशनल इव्हेंटमध्ये चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ट्रेलरने आधीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्यानंतर, आता या प्रमोशनल टूरने प्रेक्षकांमध्ये अधिकच उत्सुकता निर्माण केली आहे.
अज्ञाताचा फोन अन् महापुरूषांना शिवीगाळ; किरण मानेंनी फोन नंबर केला जाहीर
या चित्रपटाद्वारे ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिका पिंटो हे दोघंही बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिकेतून पदार्पण करत आहेत. ट्रेलरमध्ये दोघांची केमिस्ट्री आणि परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आली असून, ही दोघं नवखे आहेत असं कोणालाच वाटत नाहीये. विशेष म्हणजे, ऐश्वर्य केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर गीतकार आणि संगीतकार म्हणूनही या चित्रपटातून डेब्यू करत आहेत. चित्रपटातील गाणं “पिजन कबूतर भैया, उडन फ्लाय, लुक देखो आसमान इस्काय” सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झालं आहे आणि लोकांच्या ओठांवर सतत गाजत आहे. हे गाणं एक परफेक्ट ईअरवर्म ठरत आहे.
गरिब खासदार-आमदारांना गिफ्ट! म्हाडाच्या सोडतीत 113 घरं राखीव
अॅमेझॉन MGM स्टुडिओ प्रस्तुत ‘निशानची’ हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रिलीजआधीच हा चित्रपट इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना यांसारख्या दिग्गज कलाकारांनीसुद्धा ट्रेलरचं कौतुक केलं आहे.चित्रपटात देसी मसाल्याचा टच असून, संगीत, कथा आणि अभिनय यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, ऐश्वर्य ठाकरे यांचा या चित्रपटात डबल रोल आहे, ज्यामुळे हे पदार्पण आणखीनच लक्षवेधी ठरत आहे.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना गुडन्यूज! वयोमर्यादा ओलांडली तरी संधी मिळणार
चित्रपटात ऐश्वर्य आणि वेदिकासोबत मोनिका पनवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांसारखे दमदार कलाकार झळकणार असून, त्यांच्या उपस्थितीने कथानकाला अधिक गहिराई मिळणार आहे. ‘जार पिक्चर्स’ (अजय राय आणि रंजन सिंग) आणि ‘फ्लिप फिल्म्स’ यांच्या संयुक्त बॅनरखाली निर्मित, हा चित्रपट प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी संयुक्तपणे लिहिला आहे. अॅक्शन, ह्युमर आणि ड्रामाने भरलेला हा फुल मसाला एंटरटेनर 19 सप्टेंबरपासून सर्व भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.