Bad Cop: अनुराग कश्यप आगामी सिरीजमध्ये दुहेरी भूमिकेत, ‘बॅड कॉप’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Bad Cop Trailer Release: चित्रपटांच्या दुनियेत एकापेक्षा एक कथा आणणारा अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आता पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहे, तीही वेब सीरिजमध्ये. बॅड कॉप असे त्याच्या आगामी वेब सिरीजचे नाव आहे. (Bad Cop Web series) या सिरीजत अनुराग कश्यप खलनायकाच्या भूमिकेत आहे. याशिवाय बॅड कॉपमध्ये गुलशन देवैयाची दुहेरी भूमिका आहे. या वेब सिरीजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज (Bad Cop Trailer) झाला आहे
And the trailer just dropped…#BadCop coming June 21 on @DisneyPlusHSpic.twitter.com/AxFQEvqPpB https://t.co/azKegNHZn0
— BINGED (@Binged_) June 7, 2024
बॅड कॉपचा ट्रेलर कसा आहे?
बॅड कॉपच्या ट्रेलरमध्ये गुलशन देवैया दुहेरी भूमिकेत आहे. त्यातील एक करण आणि दुसरा अर्जुन. करण पोलिस बनतो आणि अर्जुन चोर होतो. संपूर्ण कथा एका हत्येचा तपास आणि त्याचे पुरावे नष्ट करणे आणि लपवणे यावर आधारित आहे. चोर आणि पोलिसांची कथा ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. या सिरिजमध्ये अनुराग कश्यपही आपले अभिनय कौशल्य सिद्ध करताना दिसणार आहे. अनुरागने सिद्ध केले आहे की तो एक उत्तम दिग्दर्शकच नाही तर एक सशक्त अभिनेताही आहे.
बॅड कॉप मनोरंजनाचा बॉम्ब असेल
बॅड कॉपच्या ट्रेलरमध्ये अनुराग कश्यपचा एक डायलॉग आहे, देख मैं खूप गोरा माणूस आहे…इतका गोरा की मी रात्री चमकतो…असे डायलॉग्स ऐकून तुम्हाला नक्कीच हसू येणार आहे. एकंदरीत वेब सिरीजचा ट्रेलर खूपच चांगला असून ही वेब सिरीज मनोरंजनाचा तडका असणार आहे. गुलशन देवय्याही आपल्या उत्कृष्ट व्यक्तिरेखेने मनोरंजनासाठी सज्ज आहेत.
Panchayat 4: ‘पंचायत’ची तारीख कन्फर्म! ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित
ही सिरीज कधी आणि कुठे पाहायला मिळणार
ही वेब सिरीज 21 जून रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. रिलीजची तारीख जाहीर झाल्याने प्रेक्षक खूप खूश दिसत आहेत. या सिरीजचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले आहे.