Download App

Neha Pendse: टेलिव्हिजन गाजवलं; आता अभिनेत्री लवकरच ओटीटी मध्ये पदार्पण करणार?

Neha Pendse On OTT: मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटात काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे (Neha Pendse) या गुणी मराठी अभिनेत्रीचं नाव कायम घेतलं जातं. अनेक चित्रपट आणि सिरियलमधून मधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या (social media) माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु आता नेहा लवकरच ओटीटी (OTT) स्पेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे.

नेहाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केलं तर आहे, आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने बॉलीवूड आणि टेलिव्हिजनमध्येही आपला अनोखा ठसा उमटवला आहे. आता नेहा ओटीटी स्पेसमध्ये प्रवेश करणार का ? याची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नेहाच्या चमकदार कामगिरीमुळे आता ती OTT विश्वात मोठी झेप घेऊन एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. तिचे चाहते यासाठी उत्सुक तर आहेच पण नेहा काय भूमिका साकारणार हे बघण महत्वाचं ठरणार आहे. ‘मे आय कम इन मॅडम?’ आणि ‘भाभी जी घर पर है’ साठी मिळालेल्या उत्तुंग यशामुळे आणि प्रतिसादामुळे नेहा पेंडसेचे टेलिव्हिजनवरून ओटीटी स्पेसमध्ये होणारी एंट्री नक्कीच उल्लेखनीय असणार आहे.

Sonu Sood Post: शाळा आणि शिक्षणाच्या उभारणीसाठी सोनू सुदचे नवे पाऊल, म्हणाला….

‘मे आय कम इन मॅडम?’ च्या सीझन 2 मध्ये शेवटची दिसलेली अभिनेत्री आता तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी तयारी करत असून लवकरच ती नव्या प्रोजेक्ट बद्दल घोषणा करणार आहे. नेहाने आजवर अनेक लोकप्रिय सिरीयल आणि चित्रपटात काम केलं आहे. नेहाच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आता मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

follow us

वेब स्टोरीज