Download App

Tikali: ‘तिकळी’ या नवीन रहस्यमय मालिकेत दिसणार पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर

Tikali Coming Soon Series : एकापेक्षा जास्त हटके विषय घेऊन येणारी सन मराठी वाहिनी आता अजून काहीतरी नवं करु पाहत आहे.

Tikali Coming Soon Series : एकापेक्षा जास्त हटके विषय घेऊन येणारी सन मराठी वाहिनी आता अजून काहीतरी नवं करु पाहत आहे. (Marathi Series) कौटुंबिक गोष्ट, सासू-सुनाची कथा, प्रेमकथा या सगळ्या विषयांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. (Social media) प्रेक्षकांचे एखाद्या थरारक गोष्टीच्या माध्यमातून मनोरंजन केले तर… असा विचार करत सन मराठी वाहिनी लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला नवीन मालिका ‘तिकळी’ (Tikali Series) हा थरारक विषय घेऊन येत आहे.

आता ही ‘तिकळी’ कोण किंवा नेमकी काय भानगड आहे, असा प्रश्न पडला असेल तर, ‘तिकळी’ मालिकेची झलक तुम्ही एकदा बघावं लागणार आहे. जिच्यासोबत गावकरी दोन हात लांब राहतात, जिचं आयुष्यात असणं म्हणजे आयुष्य बर्बाद होणं, ना घरची, ना दारची अशी आहे ‘तिकळी’.

पण तिकळीचं नेमकं रहस्य काय, तिला दिसणारी ती व्यक्ती कोण, तिच्याशी संबंध न ठेवणं यातच आपले हित असा समज लोकांचा का आहे, इतकी आणि यापेक्षा जास्त मालिकाप्रती कुतुहलता ‘तिकळी’च्या प्रोमोने सर्वांची उत्सुकता वाढवली आहे.

Aamhi Jarange: ‘आम्ही जरांगे’ चित्रपटात अजय पुरकर साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका

अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि वैष्णवी कल्याणकर या दोघी या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहेत. तिकळीची भूमिका वैष्णवीने साकारली आहे, पण प्रोमोमध्ये जी व्यक्ती दिसते जिचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे ते पात्रं पूजा साकारत आहे. ‘तिकळी’च्या मागील गूढ सत्य लवकरच सन मराठी वाहिनीवर उलगडणार आहे.

follow us