Eka Kale Che Mani : विनोदी कौटुंबिक वेब सिरीज ‘एका काळेचे मणी’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज!

Eka Kale Che Mani : विनोदी कौटुंबिक वेब सिरीज ‘एका काळेचे मणी’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज!

Eka Kaleche Mani Web Series : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) कायम वेगवेगळे प्रयोग करत असल्याचे दिसून येत असतात. आता मराठी ओटीटी विश्वामध्ये पदार्पण करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. ‘एका काळेचे मणी’ (Eka Kaleche mani) असे या सीरिजचे नाव आहे. (Marathi series) ही सिरीज कौटुंबिक मराठी वेबसीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजची एक झलक नुकतीच चाहत्यांच्या भेटीला आली आहे. आता सिनेमाविषयी मोठी उत्सुकता आणखी वाढली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)


तसेच या सीरिजची निर्मिती मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये एकापेक्षा जास्त कलाकृतींची निर्मिती केलेले महेश मांजरेकर यांनी केली आहे. महेश मांजरेकरांनी लिहिले आहे की, आंबड गोड नात्यांची, गोड रुसव्या-फुगव्यांगी आहे ही सुपरकूल कहाणी थोडे लव्हली, थोडे इरसाल आहेत, परंतु सगळे ‘एका काळेचे मणी’. साधेभोळे वडील, एक शहाणी आई, भावंडं आणि अतरंगी शेजारी.. खिडकीतून डोकवाल तर कळेल, एका काळेच्या मण्यांची धमाल गोष्ट”.

‘एका काळेचे मणी’ ही बहुचर्चित मराठी सीरिज चाहत्यांच्या २६ जूनपासून जिओ सिनेमावर बघता येणार आहे. महेश मांजरेकरांच्या बॅनरअंतर्गत निर्मिती होत असलेल्या या सीरिजमध्ये समीर चौघुले, विशाखा सुभेदार, ऋता दुर्गुळे, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर आणि प्रशांत दामले हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या तगडी स्टारकास्ट असलेल्या सीरिजची चाहत्यांना आता मोठी उत्सुकता लागली आहे.

International Yoga Day: सेलिब्रिटींनी असा साजरा केला योग दिवस, सोशल मिडीयावर Video Viral

तसेच ‘एका काळेचे मणी’ ही कौटुंबिक मराठी विनोदी वेबसीरिज आहे. ही सीरिज चाहत्यांना पोट धरून हसवणार आहे. मध्यमवर्गीय काळे कुटुंबाची गोष्ट या सीरिजमध्ये चाहत्यांना बघायला मिळणार आहे. भन्नाट विनोदाने नटलेली, जबरदस्त डायलॉग बाजी असलेली ही वेबसिरीज येत्या २६ जून दिवशी जिओ सिनेमावर रीलीज होत आहे. या सिनेमाचे लेखन ओम भूतकरने केले आहे, तर दिग्दर्शन अतुल केतकरने केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube