Download App

Hastay Na Hasaylach Pahije : निलेश साबळेच्या शोने तीन महिन्यातच गुंडाळला गाशा, काय आहे नेमकं कारण?

Hastay Na Hasaylach Pahije: निलेश साबळेच्या या नव्या शोबाबत चाहते देखील खूप उत्सुक होते. 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या शोकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या.

Hastay Na Hasaylach Pahije New Update: उत्तम अभिनेता, विनोदवीर आणि सूत्रसंचालक असलेल्या निलेश साबळेने (Nilesh Sable) ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) संपल्यानंतर कलर्स मराठीवर ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा शो गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू केला होता. या शोमधून अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. निलेश साबळेच्या (Nilesh Sable) या नव्या शोबाबत चाहते देखील खूप उत्सुक होते. ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या शोकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र, आता हा शो लवकरच गाशा गुंडाळला आहे.


निलेश साबळेच्या ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ (Hastay Na Hasaylach Pahije) या नवीन शोला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण, हा शो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच अवघ्या तीनच महिन्यात अभिनेत्याच्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. हा शो 24 एप्रिल दिवशी सुरू झाला होता. मात्र, आता अवघ्या काही महिन्यांतच या शोला गाशा गुंडाळावा लागला आहे. निलेश साबळेसोबत या शोमध्ये ओंकार भोजने आणि भाऊ कदम देखील होते.

Hastay Na Hasaylach Pahije: ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या पडद्यामागची धमाल पाहिलंत का?

‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा शो शनि-रवि रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होत होता. मात्र, आता ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होत असल्यामुळे हा शो बंद होणार असल्याची चर्चा होत आहे. ‘बिग बॉस मराठी 5’ हा शो 28 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या शोचं सूत्रसंचालन मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.’बिग बॉस मराठी 5’मध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागल्याचं पाहायला मिळत आहे.

follow us