Nitin Desai Death : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल त्यांच्या स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. देसाई यांची ही अकाली एक्झिट प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याची उत्तरे आता शोधली जात असून नवीन माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी काल नितीन देसाई यांचा मृतदेह ताब्यात घेत मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवला होता. येथे चार डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेद केल. त्यानंतर महत्वाची माहिती मिळाली. नितीन देसाई यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला अशी प्राथमिक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर त्यांचे पार्थिव शरीर परत एनडी स्टुडिओत नेण्यात येणार असून तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
आधी आराम केला, मग काम असल्याचा बहाना सांगून…; नितीन देसाईंच्या मित्रानं सांगितली नेमकी घटना
नितीन देसाई यांनी काल कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओत आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली. सगळ्यांसाठीच ही गोष्ट धक्कादायक होती. देसाई यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलल असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यांच्यावर मोठे कर्ज होते. तसेच त्यांचा स्टुडिओवरीह जप्तीची कारवाई केली जाणार होती असेही सांगण्यात येत आहे. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक अडचणी वाढल्यामुळ त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेचा आधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी देसाई यांचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. त्यांच्या मोबाइलमधून काही ऑडिओ क्लिप्स मिळाल्या आहेत. त्यानुसार पुढील तपास केला जात आहे.
नितीन देसाई यांची एक्झिट मनाला चटका लावणारी ; राजकीय नेत्यांकडून हळहळ !
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओत गळफास घेऊन जीवन संपविले आहे. या धक्कादायक घटनेने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नितीन देसाई (Nitin Desai) यांचा राजकीय नेत्यांशी संबंध आला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी देसाई यांच्या एक्झिटवर हळहळ व्यक्त केली.