आधी आराम केला, मग काम असल्याचा बहाना सांगून…; नितीन देसाईंच्या मित्रानं सांगितली नेमकी घटना

आधी आराम केला, मग काम असल्याचा बहाना सांगून…; नितीन देसाईंच्या मित्रानं सांगितली नेमकी घटना

Nitin Desai death : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वात खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांच्या एनडी स्टुडिओत (ND Studio) आत्महत्या केली. ते आर्थिक विवंचनेत असल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोलल्या जात आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चाहते आणि मित्रांनी यावर शोक व्यक्त केला.  (dilip pithawa on nitin desai death they said nitin desai was Financial hardship)

नितीन यांनी गळफास घेतला, तेव्हा त्यांचे जवळचे सहकारी दिलीप पिठवा त्यांच्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी 1 ऑगस्टच्या रात्री घडलेला प्रकार एक वृत्तपत्राला सांगितला. ते म्हणाले, ‘नितीन देसाई हे खूप तणावात होते. सहा महिन्यांपूर्वी आपल्या मुलीच्या लग्नात ते तणावात दिसले. ते आठवडाभर झोपले देखील नव्हते. आम्ही दिल्लीहून आलो आणि थेट स्टुडिओत गेलो. त्यांनी आपल्या अटेंडंटला बंगला उघडण्यास सांगितले. कारण त्यांना थोडा वेळ आराम करायचा होता. त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली. यानंतर काही काम असल्याचं सांगून ते दुसऱ्या मजल्यावर गेले आणि तेथे त्यांनी आत्महत्या केली. ते आर्थिक संकटात सापडले होते. पण त्यांनी पवईचे कार्यालय विकल्याचे कधीही सांगितले नाही. नितीनजी आर्थिक विवंचनेत असल्यानं आम्ही त्यांना स्टुडिओ संपूर्णपणे विकण्याचा सल्लाही दिला होता.

मानहानी प्रकरणात राहुल गांधींचे सुप्रीम कोर्टात उत्तर; ‘मोदींनी माझे भाषण ऐकले नाही’ 

दिलीप हे फक्त नितीन देसाईंचे मित्र नाहीत तर त्यांनी जोश, मेला, देवदास, हम दिल दे चुके सनम या चित्रपटात एकत्र काम केले आहे. दरम्यान, या प्रकरणी रायगडचे एसपी म्हणाले की, सेटवर काम करणाऱ्या एका सहकाऱ्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. देसाई यांनी काल रात्री दिल्लीहून आल्यानंतर काही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या. त्यात सुमारे चार बिझनेसमनचा उल्लेख आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube