मुख्यमंत्र्यांनी नवीन खातं निर्माण करावं, ते म्हणजे पांघरून खातं; भ्रष्टाचारावरून उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा
नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; शेतकरी आणि विरोधी पक्षनेतेपदावरून धरले कात्रीत
Uddhav Thackeray held a press conference in Nagpur : अधिवेशन सुरू होण्याच्या पहिलेपासूनचं विरोधकांकडून शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विरोधी पक्षनेतेपदाची नेमणूक यांसारख्या विषयावरून सत्ताधारांना कात्रीत पकडलं जात आहे. त्यातच आता शिवसेना उद्धव ठाकरे(Uddhav Thackrey) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये(Nagpur) पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.
राज्यभरात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती, घरं आणि विद्यार्थ्यांची पुस्तक देखील वाहून गेली. त्याच्यानंतर एक भलं मोठं पॅकेज असा एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम राज्य सरकारकडून घोषित करण्यात आली. त्या पॅकेजचं काय झालं कोणाला माहित नाही. की त्याच देखील ठिबक सिंचन झालं. कोणताही अधिवेशन असेल तर त्या निमित्ताने पहिले अर्थसंकल्प येतो. मग मागण्या, पुरवण्या मागण्या, आणखींच्या मागण्या, 75 हजार कोटी रुपयांच्या मागण्या. ते कोठून आणणार, कोणाला देणार. पहिलेच राज्यावर 9 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहेत.
30 जानेवारीपासून अण्णा हजारेंचं पुन्हा उपोषण; लोकाआयुक्तच्या अंमलबजावणीसाठी उभारणा लढा
गेल्या महिन्याच्या अखेरीस देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं की, महाराष्ट्राकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही प्रस्ताव अजून आलेला नाही. आपलं बिंग फुटलं हे लक्षात आल्यानंतर, घाईघाईत राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवल्याचे जाहीर करण्यात आलं. मला जाणून घ्यायचाय की, हा प्रस्ताव नेमकं काय पाठवलाय, कोणाला यातून मदत मिळणार आहे. केंद्राला राज्य सरकारने हा प्रस्ताव पाठवला असेल तर तो अधिवेशनात पटलावर मांडला पाहिजे. लोकांना हे कळलं पाहिजे. शेतकऱ्यांना 1 रुपये, 5 रुपये असे पिकविम्याचे चेक आले आहेत. अधिवेशनात फक्त वेळ मारून नेली जाते. ज्वलंत प्रश्नांवर चर्चा केली जात नाही.
पहिल्या अधिवेशनात आम्ही विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव सुचवलेलं आहे. मात्र तरी देखील अजून दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेतेपदाची नेमणूक अजून झालेली नाही. उपमुख्यमंत्रीपद हे असंवैधानिक असताना देखील तुम्ही उपमुख्यमंत्रीपद देऊन सरकार चालवत असाल तर विरोधी पक्षनेतेपद द्यायला काय हरकत आहे. हे कोणाला घाबरत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांना विचारलं पाहिजे तुम्ही का विरोधी पक्षनेतेपदाची नेमणूक करत नाहीत. विरोधी पक्षनेतेपदाला नियम लावत असाल तर उपमुख्यमंत्री पद देखील रद्द करा.
देवेंद्र फडणवीस कंजूष…, अंबादास दानवेंच्या आरोपांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रत्युत्तर
सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही. हे फक्त बॅगा भरून निवडणुकांचे दौरे करत आहेत. आपण पहिले बाहेरील राज्यातील गुंडगिरीची उदाहरण देत होतो. आता बाकीच्या राज्यांत आपल्या राज्याचं उदाहरण दिलं जात असेल. इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे दडपशाही आणि गुंडगिरी वाढली आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे लगेच प्रचाराच्या तयारीला लागतील.
मित्र मित्र म्हणताना एकमेकांवर धाडी टाकत आहेत. रोज नवीन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येतात. पैशांच्या थप्प्या बाहेर येतायेत. मात्र या सगळ्या प्रकाराकडे मुख्यमंत्री जाणून बुजून लक्ष देत नाहीत. ते मात्र ढिम्म बसलेत. ‘मुख्यमंत्र्यांनी नवीन खात निर्माण करावं, पांघरून खात, आणि स्वतः त्याचा चार्ज घ्यावा’. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना त्यांनी पांघरुणात घेतलंय. ‘काय होतास तू, काय झालास तू, सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलंस तू. या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
