पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी उपमहापौर आणि 35 वर्षे नगरसेवक राहिलेल्या आबा बागुल यांचा शिवसेनेत प्रवेश

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पुण्यातील काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांचा प्रवेश.

  • Written By: Published:
Untitled Design (130)

There is a stir in Congress! Eknath Shinde slams a big leader : जशी निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली, तशा पुण्यातून अनेक धक्कादायक राजकीय बातम्या समोर येत आहेत. आज सकाळी महाविकास आघाडी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गडाला सुरुंग लावण्यात भाजपला यश आल आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील तब्बल 22 नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(DCM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत पुण्यातील(Pune) काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल(Aaba Bagul) यांनी प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे बागुल यांनी सहकुटुंब शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आबा बागुल यांनी तब्बल 7 वेळा महापालिकेची निवडणूक लढवली असून गेल्या 35 वर्षांपासून ते नगरसेवक आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी स्थायी समिती सभापती आणि पुण्याचे उपमहापौर म्हणून देखील काम पहिले आहे. आबा बागुल यांना कॉग्रेसमधून निलंबित केले होते. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान बागुल हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चा देखील सुरू होत्या. मात्र प्रवेशाबाबत गोपनीयता ठेऊन त्यांनी अचानक शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी जयश्री बागुल, मुलगा काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बागुल, काँग्रेस युवा चिटणीस कपिल बागुल, पुणे शहर काँग्रेसचे सचिव अभिषेक बागुल, माजी सरचिटणीस हेमंत बागुल, दीपक गावडे, घनशाम सावंत, विलास रत्नपारखी, जयवंत जगताप आदी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Video : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ; ठाकरे गटाच्या शहराध्यक्षांसह अनेकांनी हाती घेतलं कमळ

आबा बागुल यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला लाडक्या बहिणींनी निवडणुकीत जो धक्का दिला आहे. त्यातून काँग्रेस अजून सावरलेली नाही. सच्चा कार्यकर्त्याला पक्षात किंमत राहिलेली नाहीये. त्यामुळेच अनेकांनी शिवसेना आणि भाजपची वाट धरली असून आबा बागुल यांनी कायम सर्वसामान्यांसाठी काम केलेलं आहे. त्याच भावनेतून ते यापुढेही खाम करत राहतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पुण्याचे जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे, माजी नगरसेवक राजेश मोरे, माजी नगरसेवक संजय सोनार त्याचप्रमाणे पुण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Tags

follow us