कारंजा नगरपरिषद निवडणुकीत MIM चा दणदणीत विजय; नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव
Karanja Municipal Council Election Result : राज्यातील नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाला असून
Karanja Municipal Council Election Result : राज्यातील नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत अनेक नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे. तर कणकवलीत मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा पराभव झाला आहे.
तर दुसरीकडे आता वाशिमच्या कारंजा नगरपरिषद निवडणुकीत (Karanja Municipal Council Election Result) एमआयएमने बाजी मारली आहे. कारंजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या (MIM) उमेदवार फरीदा बानो महमद शफी पुंजानी (Farida Bano Mohammad Shafi Punjani) विजय झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या निशा रुणवाल गुलेच्छा यांचा 110 मतांनी पराभव केल्याने कारंजा नगरपरिषदेत भाजपला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
कारंजा नगरपरिषदेच्या निवडणुकीत एमआयएमचे 16 नगरसेवक विजयी झाले असून भाजपला 13 जागा मिळाले आहे तर शिंदे शिवसेनेला एकही जागा मिळालेली नाही. सद्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत आतापर्यंत एमआयएमचे 81 नगरसेवक निवडून आले आहे.
पाच कारणे ज्यामुळे प्रत्येक निवडणुकीत भाजपच विजयी होतो
कारंजा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला धक्का देत एमआयएमने बाजी मारल्याने हा भाजपच्या आमदार सई डहाके यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून कारंजा नगरपरिषदेच भाजपची पकड मजबूत मानली जात होती मात्र या निवडणुकीत एमआयएमला मतदारांनी कौल दिल्याने शहरातील राजकारणात अनेक चर्चांना उधान आले आहे. तर दुसरीकडे आता भाजपने 288 पैकी 124 नगरपरिषदांवर आणि नगरपंचायतींवर बाजी मारली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 61 नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळाला आहे.
