Download App

Adipurush च नाही तर ‘या’ चित्रपटांनाही संवादांवरुन करावा लागला होता विरोधाचा सामना

Adipurush dialogue crises : 16 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटातील अनेक गोष्टीं वरुन बराच वाद झाले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे होते ते चित्रपटातील संवाद. सिनेमामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे. या सिनेमातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. आता आदिपुरुष सिनेमाच्या मेकर्सने सिनेमातील काही डायलॉग्स बदलले देखील आहेत. (Not Only Adipurush dialogue crises many Bollywood films was troll for dialogue )

खुशखबर ! विठुरायाच्या दर्शनासाठी एसटी महामंडळही सज्ज, प्रवाशांना दिला दिलासा

विशेषकरून हनुमान म्हणजेच चित्रपटात दाखवल्याप्रमाणे बजरंग बलीच्या तोंडी असलेल्या संवादांवर आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद बदलले. मात्र सोशल मिडीयावर या चित्रपटातील संवाद मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. कपडा तेरे बाप का.., जलेगी तेरे बाप की, लंका लगा देंगे यासारखे संवाद आता या चित्रपटात बदलण्यात आले आहेत. मात्र तरी देखील चित्रपटाचे जे नुकसान व्हायचे ते झालेच आहे. कारण सिनेमा अवघ्या एका आठवड्यामध्येच बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीचे ३ दिवस दमदार कमाई करणाऱ्या या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये सोमवारपासून घट बघायला मिळाली होती. (Entertainment) आठव्या दिवशी देखील परिस्थिती जशी होती तशीच राहिली.

The Kerala Story नंतर सुदिप्तो सेन यांच्या आणखी एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटाच्या पोस्टरने वेधलं लक्ष

मात्र बॉलिवूडच्या चित्रपटातील संवादांवर आक्षेप घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक चित्रपटांमधील संवाद वादात सापडले होते. याचवर्षी प्रदर्शित झालेला पठाण हा चित्रपटही अनेक कारणांनी वादात सापडला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी संवादांमधील काही शब्द बदलण्यात आले होते. या सिनेमात रॉ या शब्दाऐवजी हमारे, लंगडे लुले च्या जागी तुटे फुटे असे शब्द बदलण्यात आले होते. तर काही ठिकाणी पीएम या शब्दाच्या जागी मंत्री हा शब्द वापरण्याता आला. अशोकचक्र शब्दाच्या जागी वीर पुरस्कार हा शब्द वापरावा लागला होता.

त्यानंतर उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवादही बदलण्यात आले होते. या चित्रपटाने अभिनेता विकी कौशला सिनेविश्वात वेगळी ओळख दिली. मात्र या चित्रपटातील ट्रेलरमध्ये विकी कौशलच्या तोडीं असलेला संवाद लोकांना खटकला होता. तो संवादनंतर काढून टाकण्याता आला. तसेच आशुतोष गोवारीकर यांच्या पानीपत या चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवाद बदलण्यात आले होते. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये क्रिती सेननच्या तोंडी असलेल्या संवादांवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यावेळी ते संवाद नंतर काढून टाकण्यात आले.

त्याचबरोबर कार्तिक आर्यनच्या पती पत्नी और वो या चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवादावर आक्षेप घेण्यात आला होता. नंतर त्या संवादातील आक्षेपार्ह शब्द काढण्यात आला होता. तर हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या चित्रपटातील ट्रेलरमधील संवादावरही आक्षेप घेण्यात आला होता. उठाओ लुंगी.. या डायलॉगवरुन वाद झाला होता. दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने या डायलॉगवर आक्षेप घेतला होता. क्या कूल है हम, ग्रँड मस्ती सारख्या चित्रपटांमध्ये अश्लिल संवादांचा वापर करण्याता आला होता. क्या कूल है हम तो आक्षेपार्ह संवाद नंतर म्यूट करण्यात आला तर ग्रँड मस्ती चित्रपटात महिलाविरोधी संवाद वापरण्यात आले होते. या आणि इतर अनेक चित्रपटांमधील संवादांवरुन वाद झाले आहेत. मात्र आदिपुरुषचा वाद हटके वळण घेताना दिसला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वाद होत असताना, आक्षेप घेतले जात असताना देखील चित्रपटाने चांगली कमाई केली.

Tags

follow us