Bastar : आणखी एक रहस्य खळबळ उडवणार? केरला स्टोरीनंतर नव्या चित्रपटाची घोषणा

Bastar : आणखी एक रहस्य खळबळ उडवणार? केरला स्टोरीनंतर नव्या चित्रपटाची घोषणा

Sudipto Sen : सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (the kerala story) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. या सिनेमावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले असले तरी देखील या सगळ्या वादाचा सिनेमाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून आले. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाला मिळालेला प्रतिसाद बघून दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी त्यांच्या दुसऱ्या सिनेमाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. (After the kerala story Sudipto Sens Bastar Movie will come )

बारामतीकरांना कुणाची भाषा समजली? ‘त्या’ विधानाची आठवण करुन देत पवारांना शिंदेंचा चिमटा

या चित्रपटाचं नाव बस्तर (Bastar) असं आहे. हा चित्रपट सुदिप्तो सेन निर्माते विपुल शाह यांच्यासोबत करणार आहेत. या चित्रपटाचं पोस्टर देखील रिलीज करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने लक्ष वेधलं आहे. कारण या चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी हा चित्रपट केरळा स्टोरीप्रमाणेच सत्य घटनेवर आधारित असणार आहे.

ST Bank Election : सदावर्तेंनी करून दाखवलं ! एसटी बँक निवडणुकीत पॅनलचा एकतर्फी विजय

या चित्रपटाच्या पोस्टर रिलीज करण्यात आलं त्या पोस्टला कॅप्शन देण्यात आले आहे की, आम्ही आमच्या बस्तर चित्रपटाची घोषणा करत आहोत. त्यामुळे तुम्ही आणखी एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटाचे साक्षीदार व्हायला तयार रहा. जो तुम्हाला आवाक् करेल. असं या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे.

दिगदर्शक सुदिप्तो सेन निर्माते विपुल शाह यांचा हा चित्रपट बस्तर चित्रफट 5 एप्रिल 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर केरळा स्टोरीनंतर आता सुदिप्तो सेन यांच्या या चित्रपटाची देखील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच सुदीप्तो सेन आता निर्माते संदीप सिंग यांच्यासोबत काम करणार असल्याची देखील घोषणा केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube