बारामतीकरांना कुणाची भाषा समजली? ‘त्या’ विधानाची आठवण करुन देत पवारांना शिंदेंचा चिमटा
Ram Shinde on Sharad Pawar : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे रविवारी बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आले होते. सिद्धरामय्या यांच्या भाषणावरुन बारामतीचे प्रभारी आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी शरद पवारांना टोमणा मारला आहे. निर्मला सीतारामन आणि सिद्धरामय्या या दोघांपैकी बारामतीकरांना नेमकी कोणाची भाषा समजली? असे राम शिंदे यांनी म्हटले आहे.
काही महिन्यापूर्वी निर्मला सीताराम यांनी बारामतीचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांच्या सभा मेळावे, भाषणांबाबत शदर पवार यांना विचारले असता त्यांनी प्रत्येक पक्षाला देशात कुठेही जाऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. बारामतीमध्ये असो पुरंदर असो त्यांचे भाषणे, विचार बारामतीकरांना सहज समजतील, अशी उपरोधिक टिप्पणी केली होती.
ST Bank Election : सदावर्तेंनी करून दाखवलं ! एसटी बँक निवडणुकीत पॅनलचा एकतर्फी विजय
त्यांच्या या टीकेला राम शिंदे यांनी उत्तर दिले आहे. राम शिंदे म्हणाले की आदरणीय पवार साहेब तुम्ही म्हटले होते… बारामतीला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली असता तुम्ही म्हणाले होते की भाषा समजेल का ..? आणि आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भेट दिली. मग या दोघांपैकी बारामतीकरांना नेमकी कोणाची भाषा समजली.? निदान बारामतीकर तरी सांगातील काय…? अशी आठवण करुन देत राम शिंदेंनी शरद पवारांना चिमटा घेतला आहे.
विठूरायाच्या दर्शनापूर्वी केसीआर यांचा मटणावर ताव! धाराशीवमध्ये बीआरएसच्या ताफ्याला ‘बोकड पार्टी’
आदरणीय पवार साहेब तुम्ही म्हटले होते ….
बारामतीला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली असता तुम्ही म्हणाले होते की भाषा समजेल का ..?
आणि
आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भेट दिली.
मग या दोघांपैकी बारामतीकरांना नेमकी कोणाची भाषा…— Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@RamShindeMLA) June 25, 2023
बारामती मतदारसंघाला खिंडार पाडण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि प्रभारी म्हणून आमदार राम शिंदे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. गेल्या वर्षभरापासून बारामती मतदार संघात भाजपने लक्ष घातले आहे. भाजपचा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना बारामती मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न आहे.