Download App

OMG 2 Story Leak: अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ची कथा झाली उघड; वाचा, काय आहे भानगड?

OMG 2 Story Plot Leaked: खिलाडीचा OMG 2 सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या सिनेमाचा टीझर गेल्या काहीच दिवसांपुर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाचा टीझर चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. OMG मध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) श्रीकृष्णाच्या भुमिकेमध्ये दिसला आहे. परंतु आता OMG 2 मध्ये खिलाडी (Khiladi ) हा भगवान शंकराच्या भुमिकेमध्ये दिसून आला आहे.

पंकज त्रिपाठी या सिनेमात सामान्य माणसाची भुमिका साकारत असल्याचे दिसत आहेत. OMG मध्ये नास्तिक असलेल्या कानजीभाईला श्रीकृष्ण मदत करत असल्याचे दिसत आहे. आता भगवान शंकर अवतार का घेणार? असा सवाल  अनेक चाहत्यांना पडला होता. OMG 2 ची कथा सध्या सोशल मीडियावर (Social media) लीक झाला आहे.

नेमकी काय आहे भानगड?

मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमाची कथा होमोफोबियावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय शाळांमध्ये लैंगिक शिक्षण अनिवार्य करण्याभोवती ही कथा असल्याचे दिसत आहे. होमोफोबिया ही एक प्रकारची भीती आहे, जी समलैंगिक लोकांमध्ये दिसून येते. या सिनेमाचे कथानक रेडिट अकाउंटवर लीक झाल्याचे दिसत आहे. त्या साइटवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सिनेमाची  कथा एका समलिंगी मुलाभोवती फिरते असल्याचे दिसत आहे.

ज्याला शाळेत विद्यार्थ्यांकडून मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. शेवटी तो मुलगा आत्महत्या करतो. या पोस्टमध्ये असे देखील सांगण्यात आले आहे. तसेच या घटनेने व्यथित झालेले कॉलेजचे प्राध्यापक पंकज त्रिपाठी कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षण सक्तीचे करण्याचा प्रयत्न करत असतात. जेणेकरून विद्यार्थ्यांना माहिती मिळेल आणि त्यामुळे दादागिरी देखील कमी होण्याची शक्यता वाटते. धार्मिक लोक याचा विरोध करत असतात आणि ते ही संकल्पना देवाच्या निर्मितीच्या विरुद्ध मानत असतात. आणि मग या कथेमध्ये भगवान शिव म्हणजेच चाहत्यांचा लाडका खिलाडी प्राध्यापकाला मदत करण्यासाठी आल्याचे दिसत आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

OMG 2 या सिनेमात पंकज त्रिपाठी शिवभक्त प्राध्यापकाच्या भूमिकेमध्ये दिसले आहे. तर यामी गौतम एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तुम्ही सर्वांनी खिलाडीला शिवशंकराच्या भुमिकेत आहे हे सर्वांनाच दिसून आले आहेत. OMG 2 या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर सेन्सॉर बोर्डाने त्यावर मोठा आक्षेप घेतल्याचे दिसत आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांना सीबीएफसी सोबत अडचणी येणार आहेत. तसेच निर्मात्यांना हा सिनेमा पुनरावलोकनसाठी समितीकडे पाठवण्यास सांगितले आहे. तसेच ‘OMG 2’ च्या निर्मात्यांना अद्याप सीबीएफसी कडून कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आली नाही.

Tags

follow us