Opportunity For Marathi Films: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत 55 व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (International Film Festival) फिल्म मार्केटमध्ये (Film Market) निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी (social media )मिळणार आहे. 1 ऑगस्ट 2023 ते 31 जुलै 2024 या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या चित्रपटांच्या प्रवेशिका मागविण्यात येत असून निर्मात्यांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज 16 ऑगस्ट 2024 पर्यंत महामंडळाच्या जनसंपर्क विभागात अथवा gfffm2024@gmail.com या ई-मेलवर सादर करायच्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=wxSI5D9EsM8
जास्तीत जास्त चित्रपट निर्मात्यांनी प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले आहे. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे त्यांना आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी मागील आठ वर्षापासून गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये शासनाच्या वतीने महामंडळ सहभागी होत आहे.
International Film Festival: नगरच्या मातीतील उत्सवमूर्ती इफ्फीमध्ये दाखविणार
यंदाही महामंडळ सहभागी होणार असून चित्रपटांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. याबाबतची अधिक माहिती महामंडळाच्या www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.