Oscar 2024: ‘ओपेनहायमर’ पासून ‘बार्बी’ पर्यंत… ‘या’ चित्रपटांना ऑस्करसाठी नामांकन

Oscar 2024 Nominations : ऑस्कर 2024 (Oscar 2024) साठीची नामांकनं जाहीर झाली आहेत. त्याची घोषणा आज (23 जानेवारी) अमेरिकेतील लॉस एंजेलिस (Los Angeles) येथील अकादमीच्या सॅम्युअल गोल्डविन थिएटरमध्ये करण्यात आली आहे. अभिनेते जॅझी बीट्झ आणि जॅक क्वेड यांनी नामांकित व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. 96 व्या अकादमी पुरस्कार किंवा ऑस्कर 2024 चा पुरस्कार सोहळा रविवार, […]

Oscar 2024

Oscar 2024

Oscar 2024 Nominations : ऑस्कर 2024 (Oscar 2024) साठीची नामांकनं जाहीर झाली आहेत. त्याची घोषणा आज (23 जानेवारी) अमेरिकेतील लॉस एंजेलिस (Los Angeles) येथील अकादमीच्या सॅम्युअल गोल्डविन थिएटरमध्ये करण्यात आली आहे. अभिनेते जॅझी बीट्झ आणि जॅक क्वेड यांनी नामांकित व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.

96 व्या अकादमी पुरस्कार किंवा ऑस्कर 2024 चा पुरस्कार सोहळा रविवार, 10 मार्चला होणार आहे. अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट आणि कॉमेडियन जिमी किमेल समारंभाचे सूत्रसंचालन करतील आणि अमेरिकेत संध्याकाळी 7 वाजल्यापासून (भारतात सोमवारी सकाळी 5.30 वाजता) पुरस्कार प्रदान केले जातील.

सर्वोत्कृष्ट चित्रपट नामांकन
सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार श्रेणीसाठी 10 चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. यामध्ये ‘अमेरिकन फिक्शन’, ‘ऍनाटॉमी ऑफ फॉल’, ‘बार्बी’, ‘द होल्डोव्हर्स’, ‘किलर्स ऑफ द मून, मेस्ट्रो’, ‘ओपेनहायमर’, ‘पास्ट लाइव्ह्स’, ‘पुअर थिंग्ज’ आणि ‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ यांचा समावेश आहे.

Shilpa Shetty चा स्टायलिश विंटर लूक पाहिला? तुम्हीही कराल फॉलो

सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्यासाठी नामांकन
ब्रॅडली कूपर (मॅस्ट्रो)
कोलमन डोमिंगो (रस्टिन)
पॉल गियामट्टी (द होल्डओव्हर्स)
क्लियोन मर्फी (ओपेनहायमर)
जेफ्री राइट (अमेरिकन फॅशन)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकने
ऍनेट बेनिंग (न्याड)
लिली ग्लॅडस्टोन (किलर ऑफ द फ्लॉवर मून)
सँड्रा हुलर (एनाटॉमी ऑफ अ फॉल)
केरी मुलिगन (मॅस्ट्रो)
एम्मा स्टोन (पुअर थिंग्ज)

Saif Ali Khan: सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, चाहत्यांकडून चिंता व्यक्त

सहाय्यक अभिनेता नामांकने
स्टर्लिंग के. ब्राउन (अमेरिकन फिक्शन), रॉबर्ट डी नीरो (किलर्स ऑफ द मून), रॉबर्ट डाउनी ज्युनियर (ओपेनहायमर), रायन गॉस्लिंग (बार्बी) आणि मार्क रफालो (पुअर थिंग्ज) यांना सहाय्यक भूमिकेत अभिनेत्यामध्ये नामांकन मिळाले आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन नामांकन
5 चित्रपटांना दिग्दर्शनासाठी नामांकन मिळाले आहे. जस्टिन ट्रीट (अ‍ॅनाटॉमी ऑफ द फॉल), मार्टिन स्कोर्सेस (किलर्स ऑफ द फ्लॉवर मून), क्रिस्टोफर नोलन (ओपेनहायमर), योर्गोस लॅन्थिमॉस (पुअर थिंग्ज) आणि जोनाथन ग्लेझर (द झोन ऑफ इंटरेस्ट) यांना नामांकन मिळाले आहे.

Fighter: हृतिक रोशन अन् अनिल कपूर यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना सादर केली #थँक्यूफायटर पत्रे!

आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म नामांकन
आयओ कॅपिटानो (इटली)
परफेक्ट डेज (जपान)
सोसायटी ऑफ द स्नो (स्पेन)
द टीचर्स लाउंज (जर्मनी)
द जोन ऑफ इंटेरेस्ट (युनायटेड किंगडम)

Exit mobile version