Download App

Oscars 2023 : मोदी, राहुल गांधी ते फडणवीस; ऑस्कर मिळाल्यानंतर कोण काय म्हणालं?

  • Written By: Last Updated:

Oscars 2023 : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असाच ठरला आहे. आज दोन भारतीय चित्रपटांना मानाच्या ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘RRR’ आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या दोघांना ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला आहे. या मोठ्या यशानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वच दिग्गज नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (Narendra Modi and other politician reaction On Oscer)

Oscar 2023 Natu Natu : ‘नाटू-नाटू’ ऑस्करविजेता बनवण्यामागे आहे ‘या’ व्यक्तीचा हात

कोण काय म्हणाले?
नाटू नाटू आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या दोघांना ऑस्कर मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ट्वीट करत अभिनंदन केले आहे. यामध्ये मोदींनी नाटू नाटू आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. नाटू नाटूची लोकप्रियता जागतिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पुढील अनेक वर्षे हे गाणे चाहत्यांच्या स्मरणात राहिल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. मोदींशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील या ऐतिहासिक विजयानंतर अभिनंदन केले आहे.

राहुल गांधी

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटमध्ये ऑस्कर जिंकल्याबद्दल @EarthSpectrum, @guneetm आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. या दोन महिलांनी वन्यजीव संवर्धनाचे सौंदर्य आणि महत्त्व यांचे हृदयस्पर्शी प्रदर्शन करून भारताचा अभिमान वाढवल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.

Oscar 2023: नाटू -नाटूने ऑस्कर पुरस्कार जिंकला, आरआरआरच्या टीमच्या आनंदाला थारा नाही, पोस्ट केले…

तर, दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही या विजयाचे स्वागत करताना ट्विट केले आहे. “भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी तसेच संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.

फडणवीसांचे ट्वीट

ऑस्करवर मोहोर उमटवल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीदेखील ट्वीट केले आहे. आजचा दिवस अभूतपूर्व असून, ऑस्कर सोहळ्यात आम्हा सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हणत फडणवीसांनी भारतासह RRR आणि TheElephantWhisperers टीमचे अभिनंदन केले आहे. NaatuNaatu ने केवळ जगभरातील प्रेक्षकांनाच भुरळ घातली नाही, तर ती आता इतिहासात कोरली गेल्याचे फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Tags

follow us