Oscar 2023 Natu Natu : ‘नाटू-नाटू’ ऑस्करविजेता बनवण्यामागे आहे ‘या’ व्यक्तीचा हात

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out

Oscar 2023 Natu Natu : दोन भारतीय चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाल्याने चित्रपटसृष्टीसह देशभरात आनंदाला उधाण आलं आहे. दक्षिण भारतातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमधील सर्वोत्कृष्ट मूळ गामे या श्रेणीतून पुरस्कार मिळाला आहे. नाटू नाटूच्या स्पर्धेत टेल इट लाइक अ वुमन, होल्ड माय हँड फ्रॉम टॉप गन: मॅव्हरिक, लिफ्ट माय अप फ्रॉम ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर, आणि धिस इज ए लाइफ फ्रॉम एव्हरीथिंग, एव्हरीव्हेअर, ऑल अॅट वन्स ही गाणी होती. या सर्वांवर मात करत नाटू नाटूने पुरस्कारावर आपली मोहर उमटवली.
मात्र, या गाण्याला सर्वोच्च पुरस्कार मिळवून देण्यामागे एमएम कीरवाणी यांचा मोठा हात आहे. आज आपण नाटू नाटूला ऑस्कर मिळवून देण्यामागे मोलाची भूमिका बजावणारे एमएम कीरावानी कोण आहे हे जाणून घेणार आहोत.

एमएम कीरवानी हे मूळचे आंध्र प्रदेशातील कोव्वूरचे आहेत. तसेच ते संगीतदृष्ट्या प्रतिभावान वंशाशी संबंधित आहे. त्यांचे वडील गीतकार आणि पटकथा लेखक आहेत. तर त्यांचा भाऊ गायक आणि संगीत दिग्दर्शक आहे. एवढेच नव्हे तर, एमएम कीरावानी ही साऊथचे स्टार डायरेक्टर एसएस राजामौली याचे चुलत भाऊ आहे.

Oscar 2023: नाटू -नाटूने ऑस्कर पुरस्कार जिंकला, आरआरआरच्या टीमच्या आनंदाला थारा नाही, पोस्ट केले…

एम.एम.कीरवाणींची सुरुवात

एम एम कीरावाणी यांनी तेलुगु चित्रपट क्षेक्षात सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. ज्येष्ठ गीतकार वेतुरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले. 1990 चा चित्रपट ‘मनसु ममता’ हा त्यांच्या करिअरमधील पहिला मोठा ब्रेक होता.

Oscar Awards 2023 : भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ची ऑस्करवर मोहोर!

या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने करण्यात आले आहे सन्मानित

एमएम कीरावाणी यांनी ऑस्करसारख्या प्रसिद्ध पुरस्कारापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. एवढेच नव्हे तर, एमएम कीरावाणी यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना ‘मगधीरा’ आणि ‘बाहुबली 2’ मधील हिट साउंडट्रॅकसाठीदेखील पुरस्कार मिळाले आहेत.

Tags

follow us