पाकिस्तानी अभिनेत्याची प्रियांका चोप्रावर टीका, थेट लावला हा अत्यंत गंभीर आरोप

Pakistani actor Adnan Siddiqui salms Priyanka Chopra: गेल्या काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये अनेक खुलासे करणारी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडमधील कंपूशाहीविषयी तिने मुलाखतीत मोठं वक्तव्य केल्याने खळबळ माजली होती. ती सोशल मीडियावर (Social media) जास्त प्रमाणात सक्रिय असून विविध गोष्टीवर नेहमी पोस्ट करत असते, पण एका अशाच पोस्टमुळे या ग्लोबल स्टारला पाकिस्तानी अभिनेत्याने […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 15T101816.233

Pakistani actor Adnan Siddiqui salms Priyanka Chopra

Pakistani actor Adnan Siddiqui salms Priyanka Chopra: गेल्या काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये अनेक खुलासे करणारी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडमधील कंपूशाहीविषयी तिने मुलाखतीत मोठं वक्तव्य केल्याने खळबळ माजली होती. ती सोशल मीडियावर (Social media) जास्त प्रमाणात सक्रिय असून विविध गोष्टीवर नेहमी पोस्ट करत असते, पण एका अशाच पोस्टमुळे या ग्लोबल स्टारला पाकिस्तानी अभिनेत्याने ट्रोल केले जात आहे. (Pakistani actor Adnan Siddiqui salms Priyanka Chopra)

देसी गर्लने पाकिस्तानी दिग्दर्शक शर्मीन ओबेद चिनॉय (Pakistani Actor Adnan Siddiqui ) यांना कलर्सची पहिली महिला आणि ‘स्टार वॉर्स’ चित्रपट दिग्दर्शित करणारी पहिली महिला बनल्याबद्दल अभिनंदन केले होते. ते करत असताना देसी गर्लने तिला ‘दक्षिण आशियाई’ म्हटले. देसी गर्लने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले होते की, “कलर्सची पहिली व्यक्ती आणि ‘स्टार वॉर्स’ चित्रपट दिग्दर्शित करणारी पहिली महिला…आणि ती दक्षिण आशियाई आहे.

शर्मीन ओबेद चिनॉय हा किती ऐतिहासिक क्षण आहे. मला तुझा अभिमान आहे.” शर्मीन चिनॉयला दक्षिण आशियाई म्हटल्याबद्दल पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकी याने प्रियांका चोप्रावर टीका करण्यास सुरुवात केली. ‘मॉम’ सिनेमातून श्रीदेवीबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा पाकिस्तानी अभिनेता अदनानने एक ट्वीट केले आहे.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

प्रियांका चोप्रा, तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की शर्मीन ओबेद चिनॉय पाकिस्तानी आहे. अगदी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्ही दक्षिण आशियाई असल्याचा दावा करण्याअगोदर जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते, तेव्हा तुम्ही तुमचे भारतीय राष्ट्रीयत्व दाखवता, असं अदनान सिद्दीकीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. अदनानच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत प्रियांकाला तिचे नॉलेज वाढवण्याचा सल्ला दिला आहे. शर्मीन पाकिस्तानी असताना देखील तिला दक्षिण आशियाई म्हटल्यावर या अभिनेत्याबरोबरच चाहते देखील तिच्यावर जोरदार टीका करत आहेत.

Exit mobile version