Rahat Fateh Ali Khan denied news of arrest sharing video : पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan ) यांना दुबई विमानतळावर अटक ( arrest) करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. मात्र ही एक अफवा असून यावर विश्वास ठेवण्यात येऊ नये. असा व्हिडिओ स्वतः राहत फतेह अली खान यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे.
गर्भवतीसह दोन चिमुकल्यांनाही फेकलं नदीत; अनैतिक संबंधातून क्रुर प्रियकराकडून धक्कादायक प्रकार
News circulating regarding the arrest of Rahat Fateh Ali Khan is fake and baseless.
Regards Team RFAK pic.twitter.com/G9F2yBOdmZ— Rahat Fateh Ali Khan (@RFAKWorld) July 22, 2024
यामध्ये राहत फतेह अली खान म्हणाले की, मी राहत फतेह अली खान दुबईमध्ये गाण्याच्या रेकॉर्डिंग साठी आलो आहे. येथे सर्व काही ठीक आहे. त्यामुळे मला अटक झाली असल्याच्या खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकरच माझ्या देशात परत येईल. असं म्हणत राहत फतेह अली खान यांच्या आपल्याला अटक झाली असल्याच्या बातम्या फेटाळल्या आहेत.
आता मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना येणार का?, चढ्ढाला 400 कोटी दिल्याने वडेट्टीवार संतप्त
दरम्यान राहत फतेह अली खान यांच्या माजी मॅनेजरने त्यांच्या विरोधात तक्रार केल्याने त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल झाला होता. असे या बातमीमध्ये म्हटलं गेलं होतं. मात्र या प्रकरणात नेमकी कशाबद्दल तक्रार करण्यात आली होती? त्याचे खुलासे समोर आले नव्हते. त्यादरम्यानच राहत फतेह अली खान यांनी स्वतः व्हिडिओ शेअर करत या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे.
तर या अगोदर राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ते त्यांच्या विद्यार्थ्याला चपलेने मारत असल्याचे दिसून येत होत. तसेच टेबलवर ठेवलेली बॉटल कुठे गेली? असेही त्याला विचारत होते. या व्हिडिओमुळे राहत फतेह अली खान यांच्यावर चांगलीच टीका झाली होती. यावर देखील त्यांनी स्पष्टीकरण देत व्हिडिओ देखील पोस्ट केला होता.