Download App

Salman Khan: भाईजानच्या सेटवर मुलींच्या कपड्यांबद्दल नियम, ‘त्या’ वक्तव्यावर पलक तिवारीचा खुलासा

Palak Tiwari On Salman Khan: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुचर्चित सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भाईजान, पूजा हेगडेसोबतच (Pooja Hegde) व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, विजेंदर सिंग, राघव जुयाल, जस्सी गिल, भूमिका चावला आणि सिद्धार्थ निगम यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाची स्टारकास्ट सध्या जोरदार चर्चेत आहे.

सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान, श्वेता तिवारीची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारीने (Palak Tiwari) भाईजानच्या सिनेमाच्या सेटवर मुलींच्या कपड्यांबद्दल एक नियम असल्याचे भाष्य केलं होतं. आता तिने त्याबद्दल खुलासा केला आहे. भाईजानच्या सिनेमाच्या सेटवर काम करणाऱ्या सगळ्या मुलींनी स्वतःचं शरीर नीट झाकलं जाईल, असे कपडे घालायची सक्ती करण्यात आल्याचे पलकने सांगितले होते.


आता तिच्या वक्तव्याबद्दल तिने खुलासा देत त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सांगितले आहे. पलकने आपल्या एका ताज्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे, खरोखरच माझ्या वक्तव्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने काढण्यात आला आहे. मला इतकंच सांगायचं होतं की मी माझ्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या लोकांसोबत काम करत असताना कोणते कपडे घालावेत, याबद्दल स्वतःसाठी काही गाइडलाइन्स ठरवले आहेत. ज्यांचा आदर्श घेऊन मी मोठी झाले, त्यापैकी एक भाईजान आहेत.


नेमकं काय म्हणाली होती पलक तिवारी?

पलक म्हणालेली होती की, भाईजान खूप पारंपरिक आहेत. मुलींनी जे योग्य वाटेल ते कपडे परिधान करावे, असं ते म्हणतात. पण मुली सुरक्षित असाव्या, हा त्यांचा हेतू असतो. सेटवर बरेच अनोळखी पुरुष फिरत असतात. यामुळे प्रत्येकावर पूर्ण विश्वास टाकणं त्यांना जमत नाही.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

यामुळे सेटवर मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी हा नियम केले असलयाचे तिने सांगितले होते. दरम्यान, भाईजानसोबत काम करायची पलकची ही पहिली वेळ नाही. याअगोदर देखील ‘अंतिम द फायनल ट्रूथ’ या सिनेमामध्ये पलकने सहाय्यक म्हणून काम केले आहे.

Tags

follow us