Download App

विठ्ठल भेटीचा ध्यास व आस याची अनुभूती घेणारा ‘डंका… हरीनामाचा’चा ट्रेलर प्रदर्शित!

Danka Harinamacha चित्रपटाच्या निमित्ताने विठ्ठल भेटीचा ध्यास व आस याची अनुभूती घेता येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला .

Pandharpur Aashadhi Wari Film Danka Harinamacha Trailer Release : पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई ( Pandharpur Aashdhi Wari) म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आजवर अनेक चित्रपटांतून विठू माऊलीचे दर्शन तसेच माऊलींप्रती असलेल्या श्रध्देचं यथार्थ दर्शन करण्यात आलं आहे. ‘डंका…हरिनामाचा’ (Danka Harinamacha) चित्रपटाच्या निमित्ताने विठ्ठल भेटीचा ध्यास व आस याची अनुभूती घेता येणार आहे. या चित्रपटातून भक्तांच त्यांच विठ्ठलाप्रती असलेलं भावनिक नातं अधोरेखित करण्यात आलं आहे.

IND vs ZIM सामन्यातील पराभवावर थरूरांचा टोला; म्हणाले, 4 जून असो वा 6 जुलै अहंकाराला…

रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका… हरीनामाचा’ हा मराठी चित्रपट 19 जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच (Trailer Release) नुकताच करण्यात आला . चित्रपटाचा विषय हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी त्यांच्या विठ्ठलाप्रती असलेल्य भक्तीशी निगडीत आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना निश्चितच आवडेल’, असा विश्वास निर्माते रविंद्र फड व दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी व्यक्त केला.एका चांगल्या चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद कलाकारांनी व्यक्त केला.

जम्मू-कश्मीरमध्ये दहवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद; अकोल्याच्या मोरगाव भाकरे गावावर शोककळा

हरिपूर या छोट्याशा खेड्यातील विठ्ठलाची मूर्ती चोरीला गेल्यांनतर गावाचे वैभव हरवते. हे वैभव परत मिळवण्यासाठी चोरीला गेलेली मूर्ती शोधण्याची मोहीम काही गावकरी घेतात. ही मूर्ती नेमकी कोणाकडे असते? गावकरी ही मूर्ती मिळवण्यात यशस्वी होणार का? याची धमाल मनोरंजक कथा दाखवतानाच विठ्ठलाच्या भक्तीचा साक्षात्कार होऊन गावकरी विठूरायाशी कसे एकरूप होतात हे ‘डंका… हरीनामाचा’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Horoscope Today: आजचे राशी भविष्य 7 जुलै 2024, या राशीच्या लोकांनी नोकरीत सावधानतेने पाऊल उचला

कथेला साजेशी गाणी चित्रपटात आहेत. सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव अशी कलाकारांची मांदियाळी ‘डंका… हरीनामाचा’ चित्रपटात आहे. सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील रिफ्रेशिंग झालंय. हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. निर्माता रविंद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठूरायाला भक्तीभावाने समर्पित केला आहे.

‘डंका… हरीनामाचा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद श्रेयस जाधव, अंशुमन जोशी, संकेत हेंगा यांचे आहेत. छायांकन प्रदीप खानविलकर तर संकलन आशिष म्हात्रे यांचे आहे. कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. वेशभूषा सानिया देशमुख तर साहस दृश्ये परमजीत सिंह ढिल्लोन यांची आहेत. संगीताची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे.कार्यकारी निर्माते ऋषिकेश आव्हाड आहेत. अमोल कागणे फिल्म्स, फिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओज, अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणीत वायकर यांनी सांभाळली आहे.

follow us