IND vs ZIM सामन्यातील पराभवावर थरूरांचा टोला; म्हणाले, 4 जून असो वा 6 जुलै अहंकाराला…
IND vs ZIM team India defeated by Zimbabwe Shashi Tharur tweet : टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) नंतर शनिवारपासून भारतीय संघ झिम्बाब्वेशी पाच टी 20 (IND vs ZIM) सामन्यांची मालिका खेळत आहे. यामध्ये पहल्याचं सामन्यात टीम इंडियाला झिम्बाब्वेने पराभूत केले. त्यावरून कॉंग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharur) यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले शशी थरूर?
पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत पहल्याचं सामन्यात टीम इंडियाला झिम्बाब्वेने पराभूत केल्यानंतर कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी एक ट्विट केलं. त्यामध्ये ते म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषकात मिळवलेल्या विजयानंतर करण्यात आलेल्या जल्लोषाचे वातावरण अजूनही तसेच आहे. मात्र हरारे येथे आपल्या संघाला झिम्बाब्वेच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला.
So even while the echoes of the wild celebrations at Mumbai for India’s #T20WorldCup win have not died down, we have been beaten by minnows Zimbabwe today in Harare. It’s just what @BCCI deserved for taking things for granted. Whether on June 4 or on July 6, arrogance has been…
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) July 6, 2024
याचा अर्थ असा आहे की, बीसीसीआय फक्त गोष्टी गृहीत धरत आहे. तसेच चार जून असो व सहा जुलै या दोनही दिवशी अहंकाराला मात्र पायबंद बसला आहे. तसेच झिम्बाब्वेचा संघ चांगला खेळला. असं म्हणत शशी थरूर यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी यावेळी चार जूनला लागलेल्या लोकसभा निवडणुकांवरून भाजपवर देखील टीका केली आहे.
सामन्यांत नेमकं काय झालं?
पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत पहल्याचं सामन्यात टीम इंडियाला झिम्बाब्वेने 13 धावांनी पराभूत केलं. या विजयामुळे झिम्बाब्वेने या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये झिम्बाब्वेने भारताला 116 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र भारतीय संघ 102 धावांवरच सर्व बाद झाला. त्यामुळे भारतीय संघाला झिम्बाब्वेकडून 13 धावांनी पराभव पत्करावा लागला.
जम्मू-कश्मीरमध्ये दहवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद; अकोल्याच्या मोरगाव भाकरे गावावर शोककळा
पहिल्या 2 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर) , हर्षित राणा.
शेवटच्या 3 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, संजू सॅमसन, शिवम दुबे, यशस्वि कुमार, यशस्वी जैस्वाल.