T20 World Cup 2024 : सूर्यकुमार यादव पुन्हा फ्लॉप! खराब कामगिरीने चाहते निराश

T20 World Cup 2024 : सूर्यकुमार यादव पुन्हा फ्लॉप! खराब कामगिरीने चाहते निराश

T20 World Cup 2024 : आज बार्बाडोस येथे T20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024) अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA Live) यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने (Team India) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली.

दुसऱ्या ओव्हरमध्ये भारताला दोन झटके बसले होते. त्यानंतर T20 चा सर्वोत्तम फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फलंदाजीला आला मात्र तो पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात फेल ठरला.

T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला त्याच्याकडून तुफानी खेळीची अपेक्षा होती मात्र सूर्यकुमार केवळ तीन धावा करून बाद झाला. तो कागिसो रबाडाच्या चेंडूवर हेनरिक क्लासेनवी झेलबाद झाला. त्याला या सामन्यात फक्त तीन धावा करता आल्याने चाहते निराश झाले असून सोशल मीडियावर टीका करताना दिसत आहे.

तर दुसरीकडे सूर्यकुमार मोठ्या सामन्यात अपयशी ठरण्याची ही पहिलीच वेळ नाही. मोठ्या सामन्यांमध्ये तो भारतासाठी आतापर्यंत मोठी भूमिका बजावू शकला नाही. सूर्यकुमार यादव 2022 साली झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरला होता. त्या सामन्यातही सूर्यकुमारची खूप गरज होती पण तो 14 धावा करून बाद झाला. तर एकदिवसीय विश्वचषक-2023 च्या फायनलमध्येही सूर्यकुमारच्या धावांची संघाला गरज होती मात्र त्या सामन्यात देखील तो 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.  तर आज देखील तो पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला. त्याने आज 4 चेंडूत 3 धावा केल्या.

‘बापू’ ने सावरला भारताचा डाव! अक्षर-विराटच्या जोडीने केली कमाल, आफ्रिकेला 177 धावांचे लक्ष्य

सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर मात्र विराट कोहलीने शानदार खेळी करत भारताच्या डावाची धुरा सांभाळली. त्याने 59 चेंडूत 76 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 177 धावांचे लक्ष्य दिले आहे. तर आफ्रिकाकडून एनरिख नॉर्खिया आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज