‘बापू’ ने सावरला भारताचा डाव! अक्षर-विराटच्या जोडीने केली कमाल, आफ्रिकेला 177 धावांचे लक्ष्य
IND vs SA Live : आज बार्बाडोस येथे T20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024) अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA Live) यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने (Team India) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दुसऱ्याच ओव्हरमध्ये भारताला मोठा धक्का बसला.
संपूर्ण स्पर्धेत शानदार फॉर्मात असलेला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बाद झाला. त्याने 5 चेंडूत 9 धावा केल्या. तर त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर केशव महाराजने पंतची विकेट घेतली. या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. तर सूर्यकुमार यादवच्या रूपाने भारतीय संघाला तिसरा धक्का बसला. सूर्याने 4 चेंडूत 3 धावा केल्या. रबाडाने त्याचा विकेट घेतला.
भारताला 34 धावांवर तीन धक्के बसले होते. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि अक्षर पटेलने (Akshar Patel) भारतीय संघाचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. अक्षरने तुफान फटकेबाजी करत 31 चेंडूत 47 धावा केल्या. अक्षरने या दरम्यान एक चौकार आणि चार षटकार मारले. भारताच्या दहा षटकांत तीन गडी बाद 75 धावा होत्या. या अंतिम सामन्यात कोहलीने 76 धावांची शानदार खेळी केली. कोहलीने 59 चेंडूत 76 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. तर शिवम दुबेने 16 चेंडूत 27 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 177 धावांचे लक्ष्य दिले आहे. तर आफ्रिकाकडून एनरिख नॉर्खिया आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
PCMC अजितदादांना धक्का : शहराध्यक्षसह 16 माजी नगरसेवक पवारांना भेटले
या स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारताने इंग्लंडचा पराभव केला होता तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तानचा पराभव केला होता. दक्षिण क्रिकेट इतिसात आफ्रिकेचा संघ प्रथमच विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत आहे तर भारतीय संघ 10 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.