‘हिटमॅन’ रोहित आणि ‘किंग’ कोहली आज खेळणार शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना?, जाणून घ्या मोठी अपडेट

‘हिटमॅन’ रोहित आणि ‘किंग’ कोहली आज खेळणार शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना?, जाणून घ्या मोठी अपडेट

SA vs IND Live: आज भारतीय संघ (Team India) T20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी (SA vs IND) भिडणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.

तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, T20 विश्वचषक 2024 नतंर काही भारतीय खेळाडू या फॉरमॅटला अलविदा म्हणू शकतात. त्यामुळे हा सामना अनेक खेळाडूंसाठी शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो. या लिस्टमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांच्या नावाचा देखील समावेश असल्याचा सांगण्यात येत आहे. सध्या रोहित शर्मा 37 तर विराट कोहली 36 वर्षांचा आहे. आज मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचाही (Rahul Dravid) हा शेवटचा सामना आहे.

राहुल द्रविडनंतर भारतीय संघाचा गौतम गंभीर (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तो वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे संघ तयार करणार अशी चर्चा सध्या जोराने सुरु आहे. असे झाल्यास टी-20  फॉरमॅटसाठी नवीन खेळाडूंना संघात स्थान देण्यात येणार आहे त्यामुळे हा सामना काही भारतीय खेळाडूंसाठी शेवटचा ठरू शकतो.

रोहित, विराट यांनी 2022 च्या T20 विश्वचषकानंतर भारतीय संघासाठी T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नव्हते. त्यामुळे भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली या फॉरमॅटमध्ये खेळत होता मात्र T20 विश्वचषक 2024 पूर्वी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत विराट-रोहितने पुनरागमन केले. या मालिकेनंतर जय शाहने स्पष्ट केले होते की, भारतीय संघ T20 विश्वचषक 2024 रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार. त्यामुळे या स्पर्धेनंतर रोहित आणि विराट कोहली टी-20 इंटरनॅशनललाही अलविदा म्हणू शकतात.

T20I मध्ये सर्वाधिक धावा

रोहित शर्मा: 4222 धावा

बाबर आझम : 4145 धावा

विराट कोहली: 4112 धावा

पॉल स्टर्लिंग : 3601 धावा

CBI ची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये छापेमारी, पासपोर्ट सेवा केंद्रातील 32 जणांविरोधात गुन्हे दाखल

मार्टिन गप्टिल: 3531 धावा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज