Team India : जुन्या संघात जुनेच भिडू, टीम इंडियाला धक्का की विजय पक्का?
T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषक स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा पाहिला (Team India) सामना आज आयर्लंड विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी ज्या 15 खेळाडूंची निवड झाली आहे यातील आठ खेळाडू 2022 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सुद्धा होते. भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राच्या मते हीच गोष्ट संघासाठी अडचणीची ठरू शकते.
सन 2022 मधील वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनल सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. 2021 मध्ये तर भारत सुपर 12 फेरीतूनच बाद झाला होता. याच स्पर्धेत पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला होता. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डीविलियर्स बरोबरील संवादात आकाश चोप्रा म्हणाला की मागील टी 20 वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले नाही. त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये सुद्धा संघाची वाटचाल सोपी राहणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि दुबईत झालेल्या वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक राहिली. आताही त्याच खेळाडूंना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
T20 WC 2024: वर्ल्डकप सामन्यातील पहिलीच सुपर ओव्हर; नामिबियाचा ओमानवर थरारक विजय
बॅटिंग ऑर्डर मागील वेळेसारखाच वाटत आहे. गोलंदाजीतही फारसा फरक दिसत नाही. अशा परिस्थितीत संघाची वाटचाल आव्हानात्मक राहील मात्र वेस्ट इंडी मधील खेळपट्ट्या साथ देतील असे वाटते. मोठ्या मैदानावर फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्वाची राहणार आहे. भारतीय संघ याचा फायदा मिळवू शकतो, असे चोप्रा म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानंतर संघ व्यवस्थापनाचं टेन्शन वाढलं आहे.
कर्णधार रोहित शर्मा बरोबर विराट कोहली डावाची सुरुवात करील असे वाटते. प्लेइंग 11 मध्ये कोणते खेळाडू असतील याचा खुलासा अजून झालेला नाही मात्र या अकरा खेळाडूंमध्ये यशस्वी जैस्वालला संधी मिळण्याची शक्यता कमी वाटते. हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे या दोघांना संधी मिळेल असे वाटते. दुबेला संधी मिळणार नाही शक्यतो असे होणार नाही कारण षटकार खेचण्यात तो माहीर आहे. पण जर असं घडलच तर हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते.
T20 World Cup : विंडीजचा पहिला विजय! नवख्या पापुआ न्यू गिनी संघावर मात
दरम्यान, आज भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. यानंतर दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून टी 20 विश्वचषकात विजयी सुरुवात करण्याचा भारतीय संघाचा इरादा राहणार आहे. तर दुसरीकडे आयर्लंडसमोर बलाढ्य भारतीय संघाचं आव्हान राहणार आहे. याआधी आयर्लंडच्या संघाने विश्वचषकाआधी झालेल्या टी 20 सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला जोरदार टक्कर दिली होती.