Naach Ga Ghuma Poster Released: गेल्या काही वर्षांमध्ये मराठी मनोरंजनसृष्टीत स्त्री प्रधान सिनेमाची मोठ्या प्रमाणत निर्मिती झाली. मराठीमध्ये हलके-फुलके पण अनेक वेगवेगळे विचार करायला भाग पाडणारे सिनेमा बनवण्याची संख्या सध्या वाढली आहे. (Marathi Movie) ‘झिम्मा 2’, ‘बाई पण भारी देवा’ सारख्या मराठी सिनेमांनी चाहत्यांना हसवलही पण गंभीर विचार करायला भाग देखील पाडले आहे. (Social Media) आता अशाच स्त्रियांच्या अनेक वेगवेगळ्या विषयावर संबंधित नवा सिनेमा चाहत्यांना भेटीला येणार आहे. आता परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ (Naach Ga Ghuma Movie) या सिनेमाचे धमाकेदार पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.
प्रत्येक स्त्री आणि तिचं विश्व काही औरचं असतं आणि अश्याच बाईपणाची गोष्ट साजरी करायला अभिनेता स्वप्नील जोशी एक खास चित्रपट घेऊन येतोय तो म्हणजे ” नाच गं घुमा ” अभिनयाच्या पलिकडे जाऊन स्वप्नील या चित्रपटात निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. स्वप्नील कायम काहीतरी अनोखं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा हा निर्मिती चा प्रवास देखील खूप खास असणार आहे.
जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ” नाच गं घुमा ” चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला तर आलं आणि या पोस्टर ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. स्वप्नील त्याच्या निर्मिती प्रवासाबद्दल बोलताना म्हणतो ” नाच गं घुमा ” या चित्रपटाचा सह निर्माता होण ही माझ्यासाठी खूप आनंद देऊन जाणारी गोष्ट आहे. कायम परेश मोकाशी चे चित्रपट बघत आलो आणि मी त्यांचा फॅन आहे, म्हणून आयुष्यात एकदा तरी त्यांचा सोबत काम करायला मिळावं ही इच्छा होती आणि ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होते आहे.
वाळवी पासून हा प्रवास सुरू होऊन आता ” नाच गं घुमा ” पर्यंत येऊन पोहचला आहे. मधुगंधा आणि परेश यांच्या सोबत काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आणि या दोघा मुळे मी निर्मिती विश्वात पदार्पण करतोय. नुकतच चित्रपटाच चित्रीकरण पूर्ण होऊन आजच्या दिवशी चित्रपटाचं पोस्टर येणं आमच्या सगळ्या साठी भाग्याची गोष्ट आहे. उत्तम कथानक , उत्कृष्ठ संगीत आणि चित्रपटाची संपूर्ण टीम या सगळ्यांचा मेळ जुळून येऊन ” नाच गं घुमा ” घडतोय याचा खूप आनंद आहे.
चांगल्या गोष्टींचा भाग होण्याचा अभिमान कायम असतो आणि यावेळी वेगळ्या भूमिकेत असल्याने हा अभिमान अजून जास्त वाढला आहे कारण चांगल्या कलाकृती चा भाग होण आणि आपल्या हातून चांगली कलाकृती एक निर्माता म्हणून घडण ही खूप कमालीची बाब आहे. एक उत्तम माणूस घडताना आज माझ्या आयुष्यात स्त्री वर्गाचा खूप मोठा वाटा आहे आणि म्हणून ” नाच गं घुमा ” सारखा चित्रपट माझ्याहातून घडण हा निव्वळ योगायोग आहे असं मला वाटतं. लवकरच चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येईल कधी येणार? केव्हा येणार? या साठी थोडी वाट बघावी लागणार आहे पण माझ्यासोबत चित्रपटाची संपूर्ण टीम या साठी उत्सुक आहे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा स्वप्नील जोशी आता अभिनेत्याच्या पलिकडे जाऊन ” निर्माता ” होतोय. येणाऱ्या काळात नक्कीच स्वप्नील उत्तम प्रोजेक्ट मधून दिसणार आहे यात शंका नाही.
मधुगंधा कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, मालिका, चित्रपट नाटकाच्या माध्यमातून त्या चाहत्यांच्या मनोरंजन करत आल्या आहेत. अभिनयासोबत त्या एक उत्तम लेखिकाही आहेत. त्यांनी लिहिलेला ‘एलिझाबेथ एकादशी’ मराठी सिनेमा चांगलाच गाजला. लेखनासोबत त्यांनी अनेक सिनेमाची निर्मितीही केली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या निर्मिती खाली तयार झालेला ‘आत्मपॅम्फ्लेट’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. प्रेक्षकांकडून या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला.