Odela 2 First Poster: तमन्नाने महाशिवरात्रीला चाहत्यांना दिली खास भेट, ‘Odela 2’ चे पहिले पोस्टर रिलीज

Odela 2 First Poster: तमन्नाने महाशिवरात्रीला चाहत्यांना दिली खास भेट, ‘Odela 2’ चे पहिले पोस्टर रिलीज

Odela 2 First Poster Released: अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) खास प्रसंगी तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपट ‘ओडेला 2’चे (Odela 2 Movie) पहिले पोस्टर शेअर केले आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या साऊथचा सुपरहिट चित्रपट ओडेलाचा रिमेक असणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)


तमन्नाने महाशिवरात्रीला चाहत्यांना खास भेट: या पोस्टरमध्ये तमन्नाही शिवभक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे. कपाळावर चंदन, हातात डमरू आणि भगवे कपडे घातलेल्या या अभिनेत्रीचा अवतार खूपच ताकदवान दिसतो. अशा पात्रात तमन्ना पहिल्यांदाच दिसली आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यानंतर चित्रपटाच्या पोस्टरवर मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा महापूर आला आहे. अभिनेत्रीच्या या गेटअपचे सर्वजण तोंडभरून कौतुक करत आहेत.

Emraan Hashmi: बॉलिवूडचा ओजी इमरानने ‘शोटाइम’ मधील भूमिकेनं जिंकली प्रेक्षकांची मन

अभिनेत्रीने या महिन्याच्या 1 तारखेला चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. याचा एक फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘ओडेला 2’ हा सिनेमा अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दमदार पोस्टर पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज