Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया प्राइम व्हिडिओसाठी एक धमाकेदार प्रोजेक्ट करणार ?
Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही आपल्या सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Social media) वेळोवेळी तमन्नाने तिच्या कामाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. (Prime Video) सूत्रानुसार आता तमन्ना भाटिया धर्मा प्रॉडक्शनच्या (Dharma Productions) धर्माटिक एंटरटेनमेंटच्या डिजिटल विंगसोबत एकत्र येण्यासाठी सज्ज झाली आहे असं कळतंय.
अलीकडे तमन्ना भाटियाने अनोख्या भूमिका साकारून ती उत्तम काम करतेय हे दाखवून दिलं आहे. बबली बाउन्सर, आखरी सच, प्लॅन ए प्लॅन बी, जी कर्दा, आणि लस्ट स्टोरीज 2 या सारख्या उत्तमोतम प्रोजेक्ट्स ने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. आगामी काळात ती टिप्सी ड्रामाडीसह आणखी एक वेगळा प्रकार शोधण्यासाठी सज्ज आहे.
तमन्ना भाटियाचे हे सहकार्य प्राइम व्हिडिओ इंडियासाठी एक स्टार्टअप ड्रामा असणार आहे. तमन्नाच्या आगामी प्रोजेक्ट ची प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार आहे. हलक्याफुलक्या प्रोजेक्टच दिग्दर्शन अर्चित कुमार करणार असल्याचा चर्चा आहेत. या आगामी ड्रामामध्ये दोन अभिनेत्री दिसणार असून दुसऱ्या अभिनेत्रीच कास्टिंग सुरू आहे. सूत्रानुसार आगामी प्रोजेक्ट् सध्या प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. याचे शूटिंग मार्चच्या मध्यात किंवा एप्रिलच्या सुरुवातीला सुरू होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून तमन्ना भाटियाने मोठ्या पडद्यावरील चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे सुरू ठेवले आहे. तिचे Dharmatic Entertainment सोबतचे सहकार्य डिजिटल क्षेत्रातील तिचा चौथा प्रकल्प आहे. याशिवाय अभिनेत्रीकडे तिच्या मार्गाने प्रोजेक्ट्सची प्रभावी लाइनअप आहे. तमन्ना भाटिया जॉन अब्राहमसोबत वेदामध्ये आणि अरनामाई 4 नावाच्या तमिळ प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
Kanni Teaser: हृता दुर्गुळेच्या हसू अन् आसूने भरलेल्या ‘कन्नी’चे टिझर प्रदर्शित
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. अद्याप त्यांनी त्यांचं नातं अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. ‘लस्ट स्टोरीज 2’ या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान त्यांनी एकत्र काम केलं होतं. या सीरिजमधील त्यांच्या बोल्ड सीन्सची जोरदार चर्चा रंगली होती.
एका मुलाखतीच्या दरम्यान तमन्नानं लस्ट स्टोरीज-2 सिनेमातील विजयसोबतच्या इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबद्दल सांगितलं,”एखाद्या अभिनेत्यासोबत काम करताना मला इतके सुरक्षित कधीच वाटले नाही आणि ही गोष्ट एका अभिनेत्यासाठी खूप महत्त्वाचे असते. तुम्हाला काम करताना अशा प्रकारची सुरक्षितता जाणवली पाहिजे, विशेषतः अशा सिनेमात. त्याच्यामुळे मला इतके सुरक्षित वाटले की, त्या सीनमध्ये मी काही बोलण्यास, काहीही करण्यास, विशिष्ट प्रकारे भावना व्यक्त करण्यास घाबरले नाही. त्याने मला हे सर्व सोपे करुन दिले. त्यामुळे ही त्याची गोष्ट मला नक्कीच आवडणारी आहे”.