Emraan Hashmi: बॉलिवूडचा ओजी इमरानने ‘शोटाइम’ मधील भूमिकेनं जिंकली प्रेक्षकांची मन

Emraan Hashmi: बॉलिवूडचा ओजी इमरानने ‘शोटाइम’ मधील भूमिकेनं जिंकली प्रेक्षकांची मन

Emraan Hashmi: ‘शो टाईम’ची (Showtime ) प्रतीक्षा असून पुन्हा एकदा इमरान हाश्मीच्या (Emraan Hashmi) अभिनयाची जादू अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. इमरान ला या नव्या कोऱ्या भूमिकेसाठी प्रशंसा आणि प्रेम मिळतंय. बॉलीवूडचा (Bollywood) ओजी या शोमध्ये एका चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारत असून त्याने त्याच्या अभिनयाचा पराक्रम पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.

इमरानने खूप सहजतेने ही भूमिका साकारली असून हा तो कमालीचा वर्कहोलिक म्हणून त्याचं वर्णन केले आहे. इमरान कायम चर्चेत असतो, त्याचा भूमिकेसाठी नेहमी वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. याआधी ‘टायगर 3′ मध्ये अँटी-हिरोच्या भूमिकेत दिसलेला इमरान शोटाइम’ द्वारे त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा एक वेधक व्यक्तिरेखा साकारत आहे.

अलीकडेच इमरानने रघू खन्ना म्हणून त्याची भूमिका कशी लार्जर दॅन लाईफ आणि अगदी खरी आहे हे शेअर केले होते. बॉलीवूडमध्ये कॅमेऱ्याच्या मागे काय चालते याचा प्रवास ‘शोटाइम’ तुम्हाला घेऊन जातो. ‘शोटाईम’ मध्ये मौनी रॉय, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल आणि श्रिया सरन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Women’s Day : कलर्स मराठीने साजरा केला महिला दिन, भव्य बाईक रॅलीचे आयोजन

कामाच्या आघाडीवर, इमरान हाश्मीकडे अनेक मनोरंजक प्रकल्प आहेत. हा अभिनेता ‘गुडाचारी 2’ मध्ये दिसणार आहे आणि तो ‘ए वतन मेरे वतन’ मधील राम मनोहर लोहियाच्या विशेष भूमिकेने त्याच्या चाहत्यांना मोहित करण्यासाठी सज्ज आहे. त्याच्याकडे पवन कल्याण-स्टार ‘OG’ आणि ‘ग्राउंड झिरो’ हे Excel Movies सोबत असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज