Paresh Rawal demand more money for Hera Pheri 3 with Akshay Kumar : ये राजू मेरा पैसा ! ये राजू मेरा पैसा दे ! दिवारे को ही कान होते है ! अहेस्तो बोलो, क्या हुआँ. मेरे को सपना गिरा की ये राजू मेरा पैसा लेके भाग गया है, हारामी. हा डायलॉग आहे बाबूराव म्हणजेच परेश रावल ( Paresh Rawal) आणि राजू म्हणजेच अक्षय कुमारमधील (Akshay Kumar). आता तुम्हाला चित्रपट आठवलाच असणार. हा चित्रपट आहे फिर हेरा फेरी. हा चित्रपट म्हणजे फुल्ल कॉमेडी. आता या चित्रपटाचा तिसरा सिक्वल येतोय (Hera Pheri 3). चित्रपट येऊन फुल कॉमेडी होण्यापूर्वीच फुल टेन्शन तयार झालंय. बरं हे टेन्शन रिअल लाइफमध्ये बाबूराव आणि राजूमध्येच झालंय. आता राजूच म्हणतोय ये बाबूराव मेरा पैसा दे ! नेमकी दोघात वाद काय झालाय ? वाद टोकाला का गेलाय हेच पाहुया…
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल तिकडी पुन्हा प्रेक्षकांना हसविण्यासाठी फिर हेरा फेरी तीन घेऊन येत असल्याचे जाहीर करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची घोषणा करण्यात आलीय. अभिनेता अक्षय कुमारच या चित्रपटाचा प्रोड्युसर आहे. त्याचा Cape of Good Films प्रोडक्शन हाऊस चित्रपटाची निर्मिती करत आहे. तर प्रियदर्शन हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. परंतु शुटिंग सुरू झालं आणि परेश रावल आणि अक्षयकुमारमध्ये वाजलंय. परेश रावल यांनी मध्येच चित्रपट सोडण्याचे जाहीर करून टाकलं? दोघांमध्ये काय वाद झालेत. त्याचे वेगवेगळे कारणे सांगितले जात आहे. त्यात परेश रावल यांनी रोलसाठी खूप पैसे मागितल्याचे कारण दिले आहे.
लोकांची अन्न-अन्न दशा पण सरकार अन् लष्कर मात्र… युनोच्या रिपोर्टमध्ये पाकमधील धक्कादायक वास्तव समोर
परेश रावल यांनी 25 कोटी मागितले
या चित्रपटातील रोलसाठी परेश रावल यांनी 25 कोटी रुपये मानधन मागितले. परंतु हे अक्षयकुमारला पसंद पडले नाही. परंतु 25 कोटी रुपये मिळणार नसल्याने परेश रावल हे चित्रपटातून बाहेर पडले हे एक कारण आहे. दुसरे कारण म्हणजे दिग्दर्शक प्रियदर्शन आणि परेश रावल यांच्यामध्ये क्रिएटिव्ह मतभेद झाल्याचे बोलले जात आहे. परंतु परेश रावल यांनी एक्सवर एक पोस्ट करत हे कारण खोडून काढले आहे. हेरा फेरीमधून बाहेर पडण्यामागे डायरेक्टरबरोबर कुठेलही क्रिएटिव्ह मतभेद नाहीत. मी प्रियदर्शनवर खूप प्रेम करतो. त्यांचा सन्मान करतो आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे, असे रावल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
चीनी आणि तुर्कस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हजारो महिलांनी घेतली शपथ
परेश रावल यांनी मध्येच चित्रपट सोडल्यामुळे या चित्रपटाची शुटिंगही थांबविण्यात आले आहे. त्यावर अक्षय कुमार हा चिडला आहे. त्याने 25 कोटी रुपयांची भरपाई देण्याची नोटीस परेश रावल यांनी पाठवलीय. रावल यांचे वागणे प्रोफेशनल नाही. जर त्यांना चित्रपट करायचा नव्हता. तर त्यांनी कायदेशीर करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, शूटिंगवर इतके पैसे खर्च करायला लावण्यापूर्वी तसे सांगितले पाहिजे होते, असे अक्षय कुमारचे म्हणणे आहे.
दिग्दर्शक प्रियदर्शनने मांडली भूमिका
परेश रावल यांनी चित्रपट का सोडला हे सांगितलेले नाही. फिल्म करण्यापूर्वी अक्षयने मला परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्याशी चर्चा करायला सांगितले होते. दोघेही चित्रपटात रोल करायला तयार झाले आहे. अक्षयकुमारने पैसे लावले आहेत. त्यामुळे त्याने परेश रावला नोटीस पाठवली, असे प्रियदर्शन यांचे म्हणणे आहे. परेश रावल आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यासोबत ‘भूत बंगला’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत. ज्याचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, हा चित्रपट 2026 ला रिलिज होणार आहे. याशिवाय ते ‘वेलकम टू द जंगल’ या आणखी एका चित्रपटातही एकत्र काम करत आहे. दोघांमधील वाद कसा मिटेल हा प्रश्न आहे. पण फिर हेरा फेरीमधील मेरी छाती फोडी रे, मार रे सालो को मेरी खोपडी फोडी रे या डायलॉगप्रमाणे दोघांमध्ये वाद होऊ नये. पुन्हा आपल्याला कॉमेडीचा तडका बघायला भेटावा.