Hera Pheri 3 : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘हेरा फेरी 3’ (Hera Pheri 3) बाबात अनेक चर्चांना उधाण आहे. ‘हेरा फेरी 3’ अचानक परेश रावल सोडणार असल्याची चर्चा सुरु असल्याने सोशल मीडियावर चाहाते नाराजी व्यक्त करत आहे. तर आता या चित्रपटाबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलीवूड हंगामाने (Bollywood Hungama) दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटातून परेश रावल (Paresh Rawal) बाहेर झाले आहे. या वृत्तानुसार, परेश रावलने प्रोडक्शन हाऊसकडून सायनिंग अमाउंट म्हणून घेतलेले सर्व पैसे व्याजासह परत केले आहेत.
अभिनेता अक्षय कुमारचं प्रॉडक्शन हाऊस या चित्रपटाची निर्मिती करत आहे. परेश रावल आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये झालेल्या काही वादानंतर परेश रावलविरुद्ध 25 कोटींचा खटला प्रॉडक्शन हाऊसकडून दाखल करण्यात आला होता. यानंतर आता परेश रावलने सायनिंग अमाउंट परत केली असल्याची माहिती समोर आली आहे.
परेश रावलकडून सायनिंग अमाउंट व्याजासह परत
बॉलीवूड हंगामाने दिलेल्या या वृत्तानुसार, अभिनेता परेश रावलने 15 टक्के वार्षिक व्याजदरासह 11 लाख रुपयांची सायनिंग अमाउंट परत केली आहे. याचबरोबर परेश रावलने या सीरिजमधून बाहेर पडण्यासाठी काही पैसे वाढून देखील दिले असल्याचा दावा बॉलीवूड हंगामाने एका सूत्राच्या हवाले केला आहे.
बॉलीवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, परेश रावल यांना या चित्रपटात काम करण्यासाठी 15 कोटी रुपये देण्यात येणार होते. या रक्कमेपैकी 11 लाख रुपये परेश रावल यांना टर्म शीटनुसार देण्यात आले होते तर उर्वरित रक्कम चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्यानं मिळणार होते. ‘हेरा फेरी 3’ चं चित्रीकरण पुढील वर्षी सुरु होणार असून 2026 च्या शेवटी किंवा 2027 च्या सुरुवातीला चित्रपट प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे परेश रावल यांना चित्रपटाचे उर्वरित पैसे मिळण्यासाठी आणखी दोन वर्ष वाट पाहावी लागणार होती त्यामुळे त्यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
Jaaran Trailer : काळी जादू, अंधश्रद्धा आणि विवाहितेचा भूतकाळ 5 जूनला उलगडणार ?
‘हेरा फेरी’ सीरिजमधील पहिला चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर 2006 मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल आला होता. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. त्यामुळे या चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टसाठी लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.