Download App

Mission Raniganj: परिणीती अन् खिलाडीचा ‘मिशन रानीगंज’मधील पहिलं गाणं प्रदर्शित

Mission Raniganj First Song out: बॉलीवूडचा खिलाडी कुमार (Khiladi Kumar) म्हणजेच चाहत्यांचा लाडका अक्षय कुमार (Akshay Kumar) हा कायम त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जात असतो. (Parineeti Chopra) खिलाडी कुमारने त्याच्या चाहत्यांना म्हत्वाची बातमी दिल्याचे बघायला मिळत आहे. (box office) एका सत्य घटनेवर आधारित खिलाडी कुमारचा आगामी सिनेमा ‘मिशन राणीगंज’मधील परिणीतीसोबतचा पहिला गाणं प्रदर्शित करण्यात आला.

अवघ्या काही मिनिटांमध्येच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला लाखो व्ह्युज मिळाल्याचे बघायला मिळत आहे.’मिशन राणीगंज’ मधील गाण्यामध्ये परिणीती चोप्रा ही अक्षयसोबत रोमान्स करताना बघायला मिळत आहे. तसेच या सिनेमातील सुरुवातीला जमिनीखाली ३५० फूट खाणीमध्ये अडकलेल्या मजुरांपासून होत असल्याचे दिसत आहे. जेव्हा सर्वजण कामगार मेले असे गृहीत धरले जाते. तसेच खिलाडी कुमार मजुरांना वाचवण्यासाठी त्याने कोणत्या प्रकारे डोक्याचा वापर करतो. हे ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे.

यामुळे खिलाडी कुमारचा जोरदार कौतुक होत असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच खिलाडी कुमारला आणखी एक ब्लॉकबस्टर आला, असे एका चाहत्याने बोल्याचे बघायला मिळत आहे. तर हा सिनेमा खरच ब्लॉकबास्टर ठरणार असे लिहून घ्या, असे देखील एका चाहत्याने कॉमेन्टस् केल्याचे पाहायला मिळत आहे. दिवंगत जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर आधारित खिलाडीचा ‘मिशन राणीगंज’ हा सिनेमा असल्याचे सांगितले जात आहे.

‘लुझर के साथ कोई नही टिकता’; ’12 th Fail’ चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

१९८९ साली एका दगडी कोळशाच्या खाणीमध्ये अडकून बसलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी इंजिनिअर जसवंत हे स्वताच्या जीवाची पर्वा न करता कामगारांना काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची रंजक अशी कथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. ही घटना बिहारच्या रानीगंजमध्ये घडली आहे. म्हणून या मिशनला रानीगंज म्हणून देखील सांगितले जाते.

याअगोदर या सिनेमाचे नाव ‘द ग्रेट इंडियन रेस्क्यू’ असे होते. परंतु आता ‘मिशन राणीगंज: द ग्रेट भारत बचाव’ असे या सिनेमाचे नवीन नाव देण्यात आले आहे. मिशन राणीगंज सिनेमात खिलाडी कुमार,परिणीती चोप्रा, कुमुद मिश्रा असे दिग्गज कलाकार बघायला मिळणार आहेत.

Tags

follow us