Parineeti Chopra : ‘राजकारणी नवरा…’ खासदार राघव चड्ढा यांच्याशी लग्नाच्या चर्चांदरम्यान परिणीतीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Parineeti Chopra and Raghav Chadha : सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. अनेक वेळा सेलिब्रिटींच्या डेटिंगबाबत सोशल मीडिया चर्चा होत असतात. राघव चढ्ढा आणि परिणीती (Parineeti Chopra and Raghav Chadha ) हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत आहेत. दोघेही लग्न करणार असल्याचा दावा देखील केला जात आहे.   View this post on […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 03T101536.878

Parineeti Chopra

Parineeti Chopra and Raghav Chadha : सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. अनेक वेळा सेलिब्रिटींच्या डेटिंगबाबत सोशल मीडिया चर्चा होत असतात. राघव चढ्ढा आणि परिणीती (Parineeti Chopra and Raghav Chadha ) हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत आहेत. दोघेही लग्न करणार असल्याचा दावा देखील केला जात आहे.


नुकतेच परत एकदा राघव चढ्ढा आणि परिणीती हे दोघे मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) स्पॉट झाले. दोघांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरू लागल्याने परिणीती चोप्राचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही राजकारण्याशी लग्न करणार नाही, असे दावा करताना दिसून येत आहे.


फरीदून शहरयार नावाच्या अकाउंटवरून परिणीती चोप्राचा तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. तिचा हा व्हिडीओ ‘हंसी तो फसी’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान केला आहे. व्हिडीओमध्ये परिणीती सिद्धार्थ मल्होत्राबरोबर दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रॅपिड फायर राउंडमध्ये परिणीती चोप्राला राजकारण्याशी लग्न करण्याविषयी प्रश्न विचारला गेला आहे.

यावर तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे, म्हणाली की समस्या ही आहे की मला कोणत्याही राजकारण्याशी कधीच लग्न करायचे नाही. अखूप काही चांगले पर्याय आहेत, पण मला राजकारण्याशी कधीच लग्न करायचे नाही. परिणीती व खासदार राघव चड्ढा यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्यानंतर तिचा हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मला प्रवास, पाणी, समुद्र खूप आवडतो. यामुळे ज्या व्यक्तीला या गोष्टी आवडतात, तीच मला आवडणार असल्याचे परिणीतीने या मुलाखतीत सांगितली होती. दरम्यान, राघव व परिणीती एकत्र दिसत असले तरी या दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दलच्या चर्चांवर आजून देखील कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही.

ऋषी सिंहने जिंकले इंडियन आयडॉल 13 चं विजेतेपद

परिणीतीचे चित्रपट
इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी, दावत-ए-इश्क यांसारख्या हिट चित्रपटांमधून परिणीतीनं काम केलं. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. परिणीतीचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Exit mobile version