Parineeti Raghav Wedding: बॉलिवूडच्या आणखी एका कपलच ग्रॅंड वेडिंग पार पडणार आहे. त्याअगोदर या विवाहसोहळ्यापूर्वीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. आप खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadhdha) आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineet Chopra) हे 24 सप्टेंबर या दिवशी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. त्याअगोदर आज 23 सप्टेंबरपासून त्याचे विवाहापूर्वीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्यामध्ये चूडा सेरेमनीपासून फेरे घेण्यापर्यंत कसे असणार आहेत हे कार्यक्रम? जाणून घेऊ…
WC 2023 : बाबर आजमचं प्लानिंग फिसकटणार?, पाक संघाला सोडून 8 देशांना मिळाला व्हिसा
चूडा सेरेमनीपासून फेरे घेण्यापर्यंत कसे असणार कार्यक्रम?
23 सप्टेंबर दिवशी परिणिती चोप्राचा चुडा भरण्याचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार आहे. 23 सप्टेंबरला पाहुण्यांसाठी 90 च्या दशकाच्या थीमवर आधारित पार्टी आणि संध्याकाळी 7 वाजता आयोजित कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये अरदास आणि कीर्तन या सारखे पारंपारिक कार्यरक्रम देयकील ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर सुफी नाइट्सच देखील आयोजन करण्यात आलं आहे. तर दोन्ही परिवार क्रिकेट मॅच देखील खेळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
देशात अमृतकाल नाही विषकाल! बिधुरींना निलंबित करा; NCP पाठोपाठ Sanjay Raut मैदानात
24 सप्टेंबरला दुपार 1 वाजता राघव चड्डा यांना सेहराबंदसाठी जाणार आहे. 24 ला वाजत गाजत वरात घेऊन राघव लग्नाच्या ठिकाणी येणार. 24 सप्टेंबरला दुपार 3.30 वाजता जयमाला होतील आणि त्यानंतर लगेच 4 वाजता दोघे फेरे घेतील. 24 ला संध्याकाळी 6.30 वाजता परिणीतीची पाठवणी करण्यात येणार. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा रात्री 8 वाजता लीला पॅलेस हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन देण्यासाठी हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्याची थीम नाईट ऑफ अमोर अशी ठेवण्यात आली आहे.
दरम्यान या विवाहसोहळ्यासाठी बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होवू नये म्हणून चोख बंदोबस्त देखील लावण्यात येणार आहे. पाहुण्यांच्या मोबाईलवर निळ्या रंगाची टेप लावण्यात आली आहे. परिणीती आणि राघवचे लग्न खूप ग्रँड होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत होत्या. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. या जोडप्याने यावर्षी 13 मे रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये सगाई केली होती. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.