Parineeti Chopra: फोटोग्राफरने लग्नाबद्दल प्रश्न विचारताच परिणीती चोप्रा लाजली, अन् म्हणाली… हे राम!

Parineeti Chopra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटिंगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) सुरु आहे. ते अनेकदा एकत्रही दिसून आले आहेत. त्यांच्या घरचे त्यांच्या लग्नाची बोलणी करत आहेत अशाही चर्चा रंगत आहेत. अशातच परिणीतीने ती लग्न कधी करणार या प्रश्नावर […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 21T111202.742

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 21T111202.742

Parineeti Chopra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटिंगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) सुरु आहे. ते अनेकदा एकत्रही दिसून आले आहेत. त्यांच्या घरचे त्यांच्या लग्नाची बोलणी करत आहेत अशाही चर्चा रंगत आहेत. अशातच परिणीतीने ती लग्न कधी करणार या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे.


तसेच आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) खासदार राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. तर काही दिवसांअगोदरच ते दोघेही सतत एकत्र दिसल्याने एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले असतानाच काही दिवसांपूर्वी परिणीतीच्या हातात एक रिंग दिसून आली होती.

ती रिंग बघितल्यावर त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकला असल्याचे सांगितले जात आहे. यावर आता अखेर परिणीतीनेच लग्न कधी करणार या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. सध्या परिणीतीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओने ती फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राच्या घराबाहेर उभी असलेली दिसत होती. यावेळी ती पापाराझींसमोर आली. तिने त्यांना फोटोंसाठी पोझ देखील दिल्या आहेत.

Twitter ने ‘या’ भारतीय सेलिब्रेटींचे ब्लू टीक हवटले, पाहा यादी…

यावेळी अनेक फोटोग्राफर्सनी तिला अभिनंदन केले आहे. यावर तिने काही देखील प्रतिक्रिया दिली नाही. पण नंतर एका फोटोग्राफरने तिला विचारले असता, “लग्न कधी करणार आहे? यावर परिणीती लाजत म्हणाली, “हे राम!” त्यानंतर तो फोटोग्राफर परत म्हणाला आम्ही सर्वजण वाट बघत आहे. यावर ती हसत म्हणाली, “धन्यवाद.” आता तिचा हा व्हिडीओ मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर तिचे चाहते देखील अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत, त्यांच्या लग्नाविषयी चाहत्यांना खूपच उत्सुकता लागली आहे.

Exit mobile version