Twitter ने ‘या’ भारतीय सेलिब्रेटींचे ब्लू टीक हवटले, पाहा यादी…

Twitter ने  ‘या’ भारतीय सेलिब्रेटींचे ब्लू टीक हवटले,  पाहा यादी…

Twitter Removed Blue Tick Check Mark : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्याकाही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. यानुसार ते युझर्सकडून आता ब्लू टीकसाठी पैसे आकारणार होते. मात्र काही कारणांमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता.

मात्र अखेर मस्क यांनी युझर्सना धक्का देणारा हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आपल्याला अनेक व्हेरीफाईड अकाऊंटच्या ब्लू टीक थेट गायब झाल्याच्या पाहायला मिळत आहेत. यामध्ये अनेक राजकीय, चित्रपटसृष्टी आणि क्रिडा क्षेत्रातील सेलिब्रेंटींच्या व्हेरीफाईड अकाऊंटच्या ब्लू टीक ट्विटरने हटवल्या आहेत.

ज्या भारतीय सेलिब्रेटींचे ब्लू टीक हवटण्यात आले आहेत. त्यांची नाव पुढील प्रमाणे :

या नेत्यांच्या ट्विटर अकाउंटचे ब्लू टीक काढले?
ममता बनर्जी, अशोक गहलोत, अरविंद केजरीवाल, योगी आदित्यनाथ, राहुल गांधी, मनोज सिन्हा, भगवंत मान, भूपेंद्र पटेल, दिग्विजय सिंह, नितीश कुमार.

या अभिनेते-अभिनेत्रींच्या ट्विटर अकाउंटचे ब्लू टीक काढले?
शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण , रणवीर सिंह, सारा अली खान, आयुष्मान खुराना,
रवीना टंडन.

या खेळाडूंच्या ट्विटर अकाउंटचे ब्लू टीक काढले?
रोहित शर्मा, साइना नेहवाल, पीवी संधू, सानिया मिर्जा, विराट कोहली, किदांबी श्रीकांत, एमसी मेरी काम, अश्विनी पोनप्पा,योगेश्वर दत्त, वीवीएस लक्ष्मण,

ज्या राजकीय नेत्यांचे, अभिनेत्यांचे आणि खेळाडूंचे नाव येथे देण्यात आले आहेत. याशिवाय अनेक सेलिब्रेटींचे ब्लू टीक काढण्यात आले आहेत. ज्यांनी ब्लू टीकसाठी सब्सक्रिप्शन घेतलेलं नाही.

भारतात ट्विटरच्या ब्लू टिककरिता 900 रुपये प्रति महिना शुल्क भरावा लागणार आहे. देशातील 1.2 कोटी WhatsApp यूजर्स अन् 17 लाख फेसबूक यूजर्सचा डेटा लीक झाला आहे. ट्विटरवर असलेल्या बनावट खात्याना आळा घालण्याकरिता एलॉन मस्क यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube