Photographer Sutej Pannu : फोटोग्राफर सुतेज पन्नू आणि शर्वरी दादर फुलबाजारात, पहा व्हिडिओ

Photographer Sutej Pannu : जगभरातील लोकांचे हृदयस्पर्शी फोटो आणि व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेले फोटोग्राफर सुतेज सिंग पन्नू

Photographer Sutej Pannu

Photographer Sutej Pannu

Photographer Sutej Pannu : जगभरातील लोकांचे हृदयस्पर्शी फोटो आणि व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेले फोटोग्राफर सुतेज सिंग पन्नू (Photographer Sutej Pannu) यांनी मुंबईतील प्रतिष्ठित दादर फुलबाजारात (Dadar Flower Market) शर्वरीसोबत (Sharvari) एक खास सकाळ घालवली. फुलविक्रेत्यांसाठी हा दिवस संस्मरणीय बनवण्याचा दोघांनीही प्रयत्न केला.

फुलबाजारातील रंगीबेरंगी गोंधळात, शर्वरीने बाजाराच्या गजबजलेल्या उर्जेला सामोरे जात, फुलविक्रेत्यांशी मनमोकळा संवाद साधला. फक्त संवादच नाही, तर तिने स्वतः कॅमेरा हाती घेतला आणि त्या विक्रेत्यांचे नैसर्गिक भाव टिपणाऱ्या काही खास छायाचित्रांचे क्षणही कॅप्चर केले. शर्वरीसाठी हा अनुभव म्हणजे त्यांच्या आयुष्याला सुंदर करणाऱ्या आणि फुलांनी आनंद देणाऱ्या लोकांचा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न होता.

कार्यक्रम संपता संपता सुतेज यांनी शर्वरीला विचारले, “तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तुम्हाला कसे वाटले?” यावर शर्वरीने हसत उत्तर दिले, “माझ्या चेहऱ्यावरही हास्य उमटले. असे निरागस क्षण खूप खास असतात आणि त्यांना हसवणे हा माझ्यासाठी आजचा सर्वोत्तम भाग ठरला.” व्हिडिओच्या शेवटी, सुतेज यांनी शर्वरीला बाजारातील तिचा खास फोटो भेट दिला, जो त्या सुंदर क्षणांची आठवण बनला.

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार, ‘त्या’ प्रकरणात ईडीची एन्ट्री होणार?

Exit mobile version