शर्वरीच्या फिटनेसची जबरदस्त झलक! Monday Motivation म्हणत जिंकली चाहत्यांची मने

शर्वरीच्या फिटनेसची जबरदस्त झलक! Monday Motivation म्हणत जिंकली चाहत्यांची मने

Actress Sharvari Wagh News : सोशल मीडियावर शर्वरीच्या (Sharvari Wagh) फिटनेसची जबरदस्त झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. Monday Motivation म्हणून फिट पॅडल प्लेयरच्या रुपात शर्वरीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शर्वरीने सोशल मीडियावर आपल्या फिटनेसची झलक दाखवत सर्वांना सोमवारी शानदार मोटिव्हेशन (Sharvai Wagh Monday Motivation) दिलंय.

Sharvari Wagh: ‘अल्फा’च्या शेड्यूलपूर्वी शर्वरीने इंटरनेटवर घातला धुमाकूळ; पहा जबरदस्त अदा

बॉलिवूडची “हिट-गर्ल” शर्वरीने यंदाच्या वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. 100 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या मुंजा या चित्रपटातून शर्वरीने सगळ्यांच्या मनावर राज्य केले, ज्यात तिचं तरस हे वर्षातील सर्वात हिट गाणं ठरलं. हा चित्रपट दिनेश विजन यांनी निर्मित केला असून, दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलंय.

Sharvari Wagh: शर्वरीने दिला जबरदस्त मंडे मोटिवेशन, ‘अल्फा’च्या राउंड 3 साठी सज्ज!

२०२४ मध्ये यशाचा सिलसिला कायम ठेवत शर्वरीने YRF च्या महाराज या जागतिक स्तरावर हिट झालेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर निखिल अडवाणींच्या वेदा मध्येही शर्वरीचा प्रभावी अभिनय पाहायला मिळाला. आता YRF स्पाय युनिव्हर्सच्या आगामी अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना, शर्वरीने फिट पॅडल प्लेयरच्या भूमिकेतून सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना प्रेरित केलंय.

शर्वरीने तिच्या फिटनेस फोटोंसोबत मंडे मोटिवेशन असं कॅप्शन दिलंय. शर्वरीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलाय. सध्या शर्वरी अल्फा चित्रपटाच्या शूटिंगमुळे तिच्या फिटनेसच्या सर्वोच्च टप्प्यावर आहे. या चित्रपटात ती आलिया भट्टसोबत दिसणार आहे. अल्फा 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन द रेल्वे मॅन फेम शिव रवैल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharvari 🐯 (@sharvari)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube