Sharvari Wagh: शर्वरीने दिला जबरदस्त मंडे मोटिवेशन, ‘अल्फा’च्या राउंड 3 साठी सज्ज!

Sharvari Wagh: शर्वरीने दिला जबरदस्त मंडे मोटिवेशन, ‘अल्फा’च्या राउंड 3 साठी सज्ज!

Sharvari Wagh Shares Monday Motivation: अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh ) हे नाव सध्या सगळीकडेच चर्चेत आलं आहे. एकीकडे तिचा ‘मुंज्या’ हा (Munjya) चित्रपट गाजत आहे. तर, दुसरीकडे तिच्या ‘महाराज’मधील पाहुण्या भूमिकेने देखील सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची नात आहे. तिने आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत. आता शर्वरी आपल्या आगामी मोठ्या प्रोजेक्ट, YRF स्पाय युनिव्हर्सच्या बहुप्रतिक्षित सिनेमा ‘अल्फा’साठी (Alpha) पूर्ण तयारी करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharvari 🐯 (@sharvari)


आपल्या मेहनत आणि समर्पणासाठी ओळखली जाणारी शर्वरीने सोशल मीडियावर तिचे टोन्ड ऍब्स आणि ताकदीची झलक दाखवत जोरदार Monday Motivation शेअर केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “राउंड 3 साठी तयार #Alpha #MondayMotivation” आणि तिच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची झलक दिली आहे.

2024 हे वर्ष शर्वरीसाठी एक माइलस्टोन ठरलं आहे. तिने मुंज्या सह 100 कोटींचा ब्लॉकबस्टर दिला, ज्यामध्ये तिचा डान्स नंबर तरस वर्षातील सर्वात मोठ्या हिटपैकी एक ठरलं. यानंतर ग्लोबल हिट महाराज आली आणि वेदा़ मध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी तिला खूप प्रशंसा मिळाली. आता अल्फा मध्ये, जिथे ती आलिया भट्टसोबत दिसणार आहे, शर्वरी बॉलिवूडमध्ये तिची जागा बनवणार आहे.

Sharvari Wagh : ‘वेदाः’ला मिळालेल्या प्रेमामुळे रोमांचित, अभिनेत्रीने स्पष्ट सांगितले

‘अल्फा’साठी एक्शन स्किल्स शिकण्यासाठी तिचे समर्पण तिच्या मेहनतीचे द्योतक आहे. हा तिच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण ती आता अॅक्शन जॉनरमध्ये प्रवेश करत आहे. तिचा करिअर ग्राफ वेगाने वर जात आहे आणि ती भारताची पुढील मोठी अॅक्शन स्टार होण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. शर्वरी लवकरच निखिल आडवाणीच्या बहुप्रतीक्षित ‘वेदा’ आणि मग आदित्य चोपडा यांच्या ‘अल्फा’मध्ये दिसणार आहे. ‘अल्फा’चे दिग्दर्शन YRF चे तरुण आणि प्रशंसित दिग्दर्शक शिव रवैल करत आहेत, ज्यांनी ‘द रेल्वे मेन’मुळे ख्याती मिळवली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube